Mumbai Corona Update: मोठा दिलासा! धारावीत २४ तासांत एकही कोरोनाबाधिताची नोंद नाही

Coronavirus : अमेरिकेकडून कोरोनाविरोधी 'मुंबई मॉडेल'चे कौतुक
Coronavirus america Lauds 'Mumbai Model' Of Covid Management

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी मुंबईतील धारावीतून कोरोना संदर्भात मोठी दिलासादायक बाब समोर आली आहे. आज, रविवारी मुंबईतील धारावीत २४ तासांत एकही कोरोनाबाधिताची नोंद झाली नाही आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेने (BMC) माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेने सांगितले की, धारावीतील सध्या कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्णसंख्या २२ इतकी आहे. धारावीत कोरोनाची लढाई खूप महत्त्वाची आहे. एकेकाळी धारावीत सोशल डिस्टन्सिंग पाळणे अशक्य आहे, असे म्हटले जात होते. परंतु आता त्याच दाटीवाटीच्या वस्तीत एकही रुग्ण न आढळल्याचे समोर आले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये दुसऱ्यांदा धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिन्यात १४ तारखेला धारावीमध्ये एकही कोरोनाबाधित आढळला नव्हता. तसेच ८ एप्रिलला सर्वाधिक ९९ रुग्ण आढळले होते.

कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान धारावीत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत होते. मुंबईतील धारावी हा दाट लोकवस्तीची झोपडपट्टी असून तिथे सुमारे साडे आठ लाख लोकांच्या झोपडपट्ट्या आहेत. मुंबई महापालिकेच्या धारावी पॅटर्नमुळे धारावीतील कोरोना नियंत्रणात आला. धारावी पॅटर्नचे कौस्तुक जागतिक आरोग्य संघटनेने अनेक देशांमध्ये केले आहे. धारावीत ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रँकिंग आणि ट्रिटमेंटवर जोर दिला होता. शिवाय धारावीमध्ये स्पीडी ट्रायल, कोरोना नियमांचे काटेकोर अंमलबजावणी आणि नागरिकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद या सर्व गोष्टींमुळे कोरोना नियंत्रणात आणण्यात यश आले.


हेही वाचा – कोरोना महामारीत Vermont जगातील सर्वात सुरक्षित राज्य, जाणून घ्या यामागचे कारण