घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत कोरोनामुक्तांच्या संख्येत घट, २८ हजारांहून अधिक अँक्टिव रुग्ण

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनामुक्तांच्या संख्येत घट, २८ हजारांहून अधिक अँक्टिव रुग्ण

Subscribe

आज मुंबईत ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई महापालिकेच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात यश आले. बाधितांपेक्षा नेहमी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या मुंबईत सर्वाधिक होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे चित्र बदलताना दिसत आहे. मुंबईत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे. सलग दोन ते तीन दिवस मुंबईतील कोरोनामुक्तांच्या संख्येत घट होत असून बाधितांची संख्या अधिक नोंदवण्यात येत आहे. मुंबईत आज केवळ ८५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. हाच  आकडा काल १ हजार २१ इतका होता. कोरोनामुक्तांची संख्या कमी होणे ही मुंबईकरांसाठी चिंतेची बाब आहे. मुंबईत आतापर्यंत ६ लाख ५७ हजार ३०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईची रुग्णसंख्या कमी होत असली तरी मुंबईत सध्या २८ हजार ३१० अँक्टिव्ह रुग्ण आहेत. (Mumbai Corona Update: Number of corona free in Mumbai decreases, more than 28,000 active corona patients)

मुंबईत आज २८ हजार ४८० कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १ हजार २६६ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत आज १ हजार २६६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत मृतांची संख्याही गेली अनेक दिवस चढ उतार करत आहे. आज मुंबईत ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हीच संख्या काल ३४ इतकी होती. मुंबईत २० मे ते २६ मे पर्यंतचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर ०.१९ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ४१ अँक्टिव्ह कंटेनमेंट झोन तर १७९ अँक्टिव्ह सीलबंद इमारती आहेत.

- Advertisement -

मुंबईत जरी काही अंशी रुग्णसंख्या कमी असली तरीही राज्यातील काही जिल्ह्यात रुग्णसंख्या अद्याप कमी झालेली नाही. अनेक ग्रामीण जिल्ह्यात रुग्णसंख्या दुप्पटीने वाढत आहे. राज्यातील लॉकडाऊन संपण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. मात्र राज्यातील लॉकडाऊन सरसकट उठवणार नसून त्यामध्ये शिथिलता दिली जाणार आहे,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्णय घेणार आहेत.


हेही वाचा – Corona Update: महाराष्ट्रासह २४ राज्यात सक्रिय रुग्णसंख्येत घट – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -