घरCORONA UPDATEMumbai Corona Update: गेल्या २४ तासात मुंबईच्या रुग्णसंख्येत वाढ,६६ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Update: गेल्या २४ तासात मुंबईच्या रुग्णसंख्येत वाढ,६६ जणांचा मृत्यू

Subscribe

मुंबईत आज ४ हजार २९३ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईतील कमी होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे मुंबईकरांना थोडा दिलासा मिळाला होता. मुंबई पॅटर्नचे देशभरात कौतुक होत असले तरी मुंबईत काल पर्यंत कमी होत असलेली रुग्णसंख्या आज वाढली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात २ हजार ११६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. काल मुंबईत हाच आकडा १७१७ इतका होता. काल मुंबईच्या रिकव्हरी रेटमध्ये वाढ झाली होती. आज मात्र बाधित आणि मृत्यूंच्या संख्येतही वाढ झाली आहे. मुंबईत आज ६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या १४ हजार ८ इतकी झाली आहे.

- Advertisement -

मुंबईत बाधित आणि मृतांचा आकडा वाढला असला तरी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. आजही बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. मुंबईत आज ४ हजार २९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ लाख २७ हजार ३७३ इतकी झाली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेटही ९२ टक्के इतका आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण वाढीचा दर सुद्धा मंदावला आहे. मुंबईत ५ मे ते ११ मे पर्यंतचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.३८ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ८० सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींचे प्रमाणही कमी झाले आहे. सध्या मुंबईत ४४४ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

राज्यात १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण स्थगित

राज्यात सुरु असलेल्या १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण स्थगित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले डोस ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरण्याचा निर्णय आरोग्य विभागाकडून घेण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -