Mumbai corona Update: मुंबईत मृत्यूंच्या संख्येत वाढ, तर ७८८ नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत सध्या १५ हजार ९४७ अँक्टिव्ह रुग्ण

Mumbai Corona Update: 351 corona cases recorded in last 24 hours in mumbai
Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर, गेल्या २४ तासात ३५१ कोरोनबाधितांची नोंद

मुंबईच्या मृत्यूसंख्येत काल पहिल्यांदा कमालीची घट झाली होती. मात्र मुंबईच्या कोरोना आकडेवारीतील चढ उतार अद्याप सुरूच आहे. मुंबईतील मृतांची संख्या आज पुन्हा वाढली आहे. मुंबईत आज २७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईत सोमवारीही २७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. काल मुंबईत हिच संख्या केवळ ७ इतकी नोंदवण्यात आली होती. त्याचप्रमाणे मुंबईत कमी होत असलेल्या अँक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईत सध्या १५ हजार ९४७ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांपासून अँक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी नोंदवण्यात येत होती. (Mumbai corona Update: number of deaths in Mumbai has increased, 788 new corona patients registered in last 24 hours)


मुंबईतील बाधित रुग्णांचा विचार केला असता मुंबईत आज २९ हजार ८२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील ७८८ कोरोना चाचण्यात पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत गेल्या २४ तासात ७८८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या बाधित रुग्णांची संख्या ही ७ लाख १३ हजार ७९० इतकी झाली आहे.


मुंबईत नेहमी बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक नोंदवण्यात आली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्तांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आजही मुंबईत कोरोनामुक्त रुग्णांपेक्षा बाधितांची संख्या सर्वाधित नोंदवण्यात आली आहे. मुंबईत आज केवळ ५११ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही ६ लाख ८० हजार ५२० इतकी आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील अँक्टिव्ह कंटेनमेंटची संख्या २८ वर आली आहे. तर ६२ अँक्टिव्ह सीलबंद इमारती आहेत.


हेही वाचा – Maharashtra corona update: गेल्या २४ तासात कोरोना बळींच्या संख्येत घट, १०,९८९ नव्या बाधितांची नोंद