घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! आज केवळ ६७६ रुग्णांची नोंद, मृतांचा आकडाही...

Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! आज केवळ ६७६ रुग्णांची नोंद, मृतांचा आकडाही घसरला

Subscribe

आज मुंबईत ५ हजार ५७० जणांनी कोरोनावर मात केली

गेल्या काही दिवसांपासून कमी झालेली मुंबईची रुग्णसंख्या पुन्हा एकदा तीन अंकी नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आज मुंबईत सर्वात कमी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. मुंबईत आज केवळ ६७६ नव्या बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा मुंबईच्या रुग्णसंख्येत कमालीची घट पहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे मुंबईत वाढलेला मृत्यूचा आकडाही कमी झाला आहे. मुंबईत आज २९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचा वेगही आता कमी झाला आहे. मुंबईत आज १७ हजार ८६५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील ६७६ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. (Mumbai Corona Update: only 676 corona patients registered in mumbai today, death toll has dropped)

- Advertisement -

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत घट झाली होती. मात्र तरीही बाधितांपेक्षा कोरोनावर मात करण्यांची संख्या अधिक होती. आज मुंबईत ५ हजार ५७० जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता ६ लाख ६६ हजार ७९६ इतकी झाली आहे. तर मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ७ लाख ६ हजार २५१ इतकी झाली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट ९४ टक्के इतका आहे. तर २४ मे ते ३० मे पर्यंतचा मुंबईचा विचार केला असता मुंबईत रुग्णवाढीचा दर आता ०.१५ टक्के इतका झाला आहे. मुंबईची रुग्णसंख्या कमी झाली असली तरीही मुंबईत सध्या २२ हजार ३९० अँक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी आजही तितकीच काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मुंबईत सध्या कंटेनमेंट झोनची संख्याही कमी होत आहे. सध्या मुंबईत ३६ सक्रिय कंटेनमेंट झोन आणि १५८ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

- Advertisement -

मुंबईत सुरु असलेल्या लसीकरणाचा वेग थोड्या प्रमाणात मंदावल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईत लसींचा आवश्यक साठा हातात आल्यावर मुंबईत केवळ ६० दिवसात लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबई राबवण्यात आलेल्या मुंबई मॉडेलमुळे कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात मुंबई पालिकेला यश आले . मुंबईत आज नोंदवण्यात आलेल्या रुग्णसंख्येमुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी पुढील अनेक दिवस मुंबईकरांनी नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: दिलासादायक! मृतांच्या संख्येत मोठी घट; ३३ हजार रुग्ण बरे 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -