Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई Mumbai Corona Update : दुसर्‍या लाटेसाठी खासगी, पालिका रूग्णालयात खाटा राखीव ठेवण्याचे...

Mumbai Corona Update : दुसर्‍या लाटेसाठी खासगी, पालिका रूग्णालयात खाटा राखीव ठेवण्याचे आदेश

'त्या' रुग्णांना रुग्णालयात प्रवेश नाही

Related Story

- Advertisement -

सध्या मुंबईत नियंत्रणात आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता पालिकेने दुसरी लाट गृहीत धरत पूर्वतयारीला जोरदार सुरुवात केली आहे. पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी, कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी पालिका रुग्णालयात ८० टक्के खाटा तर खासगी रुग्णालयात १००टक्के खाटा आरक्षित ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे, रुग्णालयातील ऑक्‍सीजन,व्हेंटीलेटरचा आदी यंत्रणेचा सखोल आढावा घेण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

या संदर्भात आयुक्तांनी एक परिपत्रक सोमवारी रात्री जारी केले आहे. तसेच, स्ट्रक्‍चरल आणि फायर ऑडीट करुन घ्यावे. भांडूप येथील ड्रिम्स मॉलला लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभुमीवर महापालिकेने सर्व रुग्णालये, कोविड केंद्राचे फायर ऑडीट आणि स्ट्रक्‍चरल ऑडीट करुन घेण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईत दररोजच्या कोरोना रुग्णांची संख्या ५ हजारांवर गेली आहे. त्यामुळे राज्य सरकार व पालिका प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. राज्य सरकारने रविवारपासून जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. तसेच, पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

- Advertisement -

पालिका आयुक्तांनी, वाढती रुग्णसंख्या पाहता पालिका रुग्णालयात ८० टक्के तर खासगी रुग्णालयात १०० टक्के बेडस तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व खासगी सार्वजनिक रुग्णालयांच्या बेड्‌सचे नियोजन आता प्रभागातील वॉररुममधूनच होणार आहे. त्याचप्रमाणे, रुग्णालयातील ऑक्‍सीजनचा साठा, व्हेंटीलेटर आणि इतर आवश्‍यक उपकरणांची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात यावी. तसेच, सर्व खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग फक्त कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश पालिका आयुक्त चहल यांनी सर्व रुग्णालयांना दिले आहेत.

‘त्या’ रुग्णांना रुग्णालयात प्रवेश नाही

कोरोनाची लक्षणे नसलेले तसेच दिर्घकालीन आजार नसलेले कोरोनाबाधित काही वेळा खासगी रुग्णालयात परस्पर प्रवेश घेतात. या प्रकारालाही लगाम घालण्यात आला आहे. सर्व बेड्‌स नियोजन हे प्रभागाच्या वॉररुम मार्फत करण्यात येणार आहे. तसेच, लक्षण नसलेले आणि कोणताही दिर्घकालीन आजार नसलेल्या रुग्णांना रुग्णालयात प्रवेश दिला जाऊ नये, असे सक्त आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

रुग्णांसाठी प्राधान्यक्रम

- Advertisement -

रुग्णांना रुग्णालयात प्रवेश देण्याचाही प्राधान्यक्रमही प्रशासनाने ठरवला आहे.यात,पहिल्यादा प्रभागातील खासगी नर्सिंग होम्स आणि रुग्णालयात प्रवेश देण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्यानंतर कामगार रुग्णालयांमध्ये मग प्रभागाबाहेरील खासगी रुग्णालये, सरकारी आणि शेवटी पालिकेच्या रुग्णालयात प्रवेश देण्यास प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

- Advertisement -