Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update: मुंबईत १५ हजारांहून अँक्टिव्ह रूग्ण, ६६० नव्या बाधितांची नोंद

Mumbai Corona Update: मुंबईत १५ हजारांहून अँक्टिव्ह रूग्ण, ६६० नव्या बाधितांची नोंद

मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या बाधितांची संख्या ७ लाख १४ हजार ४५०

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या कोरोना रुग्णसंख्येतील चढउतार कायम आहे. मुंबईत कालच्या तुलनेत आज बाधितांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. मुंबईत आज ६६० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या ७८८ इतकी होती. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या बाधितांची संख्या ७ लाख १४ हजार ४५० इतकी झाली आहे. मुंबईत बाधितांची संख्या कमी होत असली तरीही मुंबईत १५ हजारांहून अधिक अँक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत अँक्टिव्ह रुग्णांच्या संख्येतही गेल्या काही दिवसांपासून घट होताना दिसत आहेत. मुंबईत सध्या १५ हजार ८११ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. (Mumbai Corona Update: Over 15,000 active covid19 patients in Mumbai, 660 new corona cases registered)


मुंबईत दोन दिवसांपूर्वी मृतांचा आकडा कमी होऊन ७ इतका नोंदवला गेला होता. मात्र त्यानंतर पुन्हा मृतांच्या संख्येत वाढ झाली. आज,गुरुवारी मुंबईत २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल हीच संख्या २७ इतकी होती. मुंबईत आतापर्यंत १५ हजार १२२ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. मुंबईत कोरोनावर मात करणाऱ्यांचा विचार केला असता मुंबईत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या बाधितांपेक्षा जास्त आहे. मुंबईत आज गुरुवारी ७६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल हीच संख्या ५११ इतकी होती. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा विचार केला असता मुंबईत आतापर्यंत ६ लाख ८१ हजार २८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisement -

मुंबईत आज २५ हजार ३९६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील ६६० चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. मुंबईचा रिकव्हरी ९५ टक्क्यावर आहे. तर मुंबईचा ३ जून ते ९ जून पर्यंतचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.१२ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या २५ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत तर ९३ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – महापालिकेतील कोरोनाबाधित कर्मचार्‍यांच्या माहितीची दडवादडवी

 

- Advertisement -