Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update: मुंबईकरांसाठी पॉझिटिव्ह बातमी! नव्या रुग्णसंख्येत मोठी घट, २४ तासांत...

Mumbai Corona Update: मुंबईकरांसाठी पॉझिटिव्ह बातमी! नव्या रुग्णसंख्येत मोठी घट, २४ तासांत ९ हजारांहून अधिक कोरोनामुक्त

Related Story

- Advertisement -

मुंबईत कुठेतरी कोरोनाचे चित्र दिलासादायक दिसू लागलं आहे. कोरोनाबाधितांची संख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ३ हजार ८७६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ९ हजार १५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता कोरोनाबाधितांची ६ लाख ३१ हजार ५२७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२ हजार ८५३ जणांचा मृत्यू झाला असून ५ लाख ४६ हजार ८६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ७० हजार ३७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

आज दिवसभरात मुंबईत २८ हजार ३२८ कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ५२ लाख ७२ हजार ६२ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आज ७० मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ४२ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ४१ रुग्ण पुरुष आणि २९ रुग्ण महिला होत्या. ३ रुग्णांचे वय ४० वर्षा खाली होते. तर ४३ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित २४ रुग्ण ४० ते ६० वयोगगटामधील होते.

सध्या मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के एवढे आहे. १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोरोना वाढीचा दर १.०९ टक्के इतका झाला आहे. तर मुंबईतील दुप्पटीचा दर ६२ दिवस झाला आहे. सध्या मुंबईत १०४ सक्रिय कंटेनमेंट झोन असून १ हजार ८४ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Lockdown 2021: १ मे नंतर कडक निर्बंधांचा कालावधी वाढणार? महापालिका आयुक्तांचा मोठा खुलासा


 

- Advertisement -