Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासादायक बातमी! कोरोनामुक्तांची संख्या बाधितांपेक्षा अधिक

Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासादायक बातमी! कोरोनामुक्तांची संख्या बाधितांपेक्षा अधिक

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनामुक्तांची संख्या कोरोनाबाधितांपेक्षा अधिक नोंद होत आहे. आज देखील असेच काहीसे दिलासादायक चित्र दिसले आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ५ हजार ५४२ नव्या कोरोनाबाधित आढळले असून ६४ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. तर ८ हजार ४७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख २७ हजार ६५१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२ हजार ७८३ जणांचा मृत्यू झाला असून ५ लाख ३७ हजार ७११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८६ टक्के इतका आहे.

- Advertisement -

मुंबईत सध्या ७५ हजार ७४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात ४० हजार २९८ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ५२ लाख ४३ हजार ७३४ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहे. दरम्यान १८ एप्रिल ते १४ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोरोना वाढीचा दर १.१७ टक्के इतका आहे. सध्या मुंबईतील दुप्पटीचा दर ५९ दिवस झाला आहे.

मुंबईत सध्या ११४ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर १ हजार १६६ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. दरम्यान चिंतेची बाब म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका मुंबई पोलिसांना बसताना दिसत आहे. फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून कोरोनाच्या काळात २४ तास आपले कर्तव्य बजावणाऱ्या अनेक पोलिसांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. काल मुंबईतल्या २ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आतार्यंत मुंबई पोलीस दलात १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccination: मुंबईकरांनो उद्या सर्व लसीकरण केंद्र सुरू राहणार, पण Covaxin लसीचे डोस ‘यांनाच’ मिळणार


- Advertisement -