Eco friendly bappa Competition
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update: मुंबईकरांनो काळजी घ्या! मुंबईत २४ तासांत ६,३४७ नव्या रुग्णांची...

Mumbai Corona Update: मुंबईकरांनो काळजी घ्या! मुंबईत २४ तासांत ६,३४७ नव्या रुग्णांची वाढ!

Subscribe

मुंबईतील दुप्पटीचा दर २५१ दिवस झाला असून सध्या रिकव्हरी रेट ९५ टक्के आहे. आज दिवसभरात मुंबई ४७ हजार ९७८ कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत १ कोटी ३७ लाख १८ हजार २४० कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने खूप वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ६ हजार ३४७ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून एका मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत शुक्रवारी नोंद झालेल्या ५ हजार ६३१ कोरोनाबाधितांच्या तुलनेत आज ७१६ कोरोनाबाधितांची अधिक भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख ९१ हजार ४५७वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ३७७ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ५० हजार १५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत २२ हजार ३३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मुंबईत आज कोरोनामुळे मृत्यू झालेली रुग्ण महिला असून ती ६० वर्षांवरील होती. चिंताजनक बाब म्हणजे मुंबईतील दुप्पटीचा रुग्ण दर २५१ दिवस झाला आहे. तसेच सध्या रिकव्हरी रेट ९५ टक्के आहे. आज दिवसभरात मुंबई ४७ हजार ९७८ कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत १ कोटी ३७ लाख १८ हजार २४० कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत.

मुंबईत काही महिन्यांपूर्वी सक्रिय सीलबंद इमारतीचा आकडा ० होता तो आता १५७वर पोहोचला आहे. तसेच १० सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. यादरम्यान मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढत राहिली तर काही दिवसांसाठी लॉकडाऊन लावण्याचा विचार केला जाईल, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – Lockdown: रुग्णसंख्या वाढली तर मुंबईत काही दिवसांसाठी लॉकडाऊन; पालकमंत्री अस्लम शेख यांचा इशारा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -