Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update: मुंबईची कोरोनातून रिकव्हरीकडे वाटचाल, रुग्णसंख्येत लक्षणीय घट

Mumbai Corona Update: मुंबईची कोरोनातून रिकव्हरीकडे वाटचाल, रुग्णसंख्येत लक्षणीय घट

मुंबईतील कंटेनमेंट झोनची संख्या ही कमी होताना दिसत आहे

Related Story

- Advertisement -

मुंबईत ‘ब्रेक द चेन’च्या ( Break The Chain) अंतर्गत लावलेल्या निर्बंधांचा चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आजही मुंबईच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झालेली पहायला मिळत आहे. आज मुंबईत २ हजार ६६२ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच रुग्णसंख्या  ५ हजारांच्या घरात होती. त्याचबरोबर मुंबईचा रिकव्हरी रेटही वाढला आहे. मुंबईत आज ५ हजार ७४६ रुणां बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट ८९ टक्के इतका झाला आहे. मुंबईत आतापर्यंत ५ लाख ८९ हजार ६१९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


मुंबईत आज ७८ जणांचा कोरोमुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईत मृतांची संख्याही १३ हजार ४०८ इतकी झाली आहे. मुंबईत करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांची संख्याही कमी होताना दिसत आहे. मुंबईत आज २३ हजार ५४२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत २६ एप्रिल ते २ मे पर्यंतचा विचार केला असता मुंबईत रुग्णवाढीचा दर हा ०.६१ टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील कंटेनमेंट झोनची संख्या ही कमी होताना दिसत आहे. तर सीलबंद इमारतींचे प्रमाणाही कमी झाले आहेत. मुंबईत सध्या ९३ कंटेनमेंट झोन तर ८१४ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

- Advertisement -

मुंबईतील कोरोनाची साखळी येत्या दोन ते तीन दिवसात संपुष्टात येणार आहे. त्याचप्रमाणे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही घटणार असल्याचे मुंबई पालिकेचे आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे. मुंबईत मृतांच्या संख्येत वाढ झाल्याने टास्क फोर्सच्या तज्ज्ञांशी त्यांनी चर्चा केली. त्यामुळे मुंबईकरांना कोरोनापासून काही दिवसात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट

- Advertisement -