Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ५०० हून कमी, कोरोनामुक्त रुग्णांची संख्या...

Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ५०० हून कमी, कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली

Related Story

- Advertisement -

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ५०० हून कमी झाली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुबंई महानगरपालिका आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे. मुंबईत मागील २४ तासात ४४१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर मुंबईत मागील आठवड्यात २० हून अधिक कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात येत होती ती आता १० पेक्षा कमी झाली आहे. दिवसभरात ८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील पालिका क्षेत्रात गेल्या २४ तासात ६०० कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत ६ हजार ९५० कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत एकूण ७ लाख २८ हजार ६१५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ७ लाख ३ हजार ६७७ कोरोनाबाधितांवर यशस्वी मात केली आहे. आतापर्यंत एकूण १५ हजार ६४४ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मुंबईतील कोरोबाधित रुग्णांच्या दुप्पटीचा दर हा ९२५ दिवसावंर गेला आहे. मुबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ९६ टक्क्यांवर आहे. मागील एक आठवड्याचा कोरोना रुग्ण वाढीचा दर ०.०७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्याचे ध्येय पालिका प्रशासनानं ठेवलं असून त्या पद्धतीने उपाययोजना सुरु आहेत.

- Advertisement -

मुंबईत गेल्या २४ तासात ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ४ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ५ रुग्ण पुरुष व ३ रुग्ण महिला होते. २ रुग्णाचे वय ४० वर्षा खाली होते. ४ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. उर्वरित २ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते.

- Advertisement -