घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत कोरोनाचा कहर सुरुच! आज नव्या ८ हजारांहून अधिक...

Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाचा कहर सुरुच! आज नव्या ८ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

Subscribe

मुंबईत कोरोनाचा कहर सुरुच आहे. मुंबईसह राज्यातील लॉकडाऊन 2.O चा ( Lockdown 2.O ) आजचा तिसरा दिवस आहे. मुंबईतील रुग्णसंख्या (Mumbai Corona Update) दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज मुंबईत ८ हजार ८३९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई आतापर्यंत नोंद करण्यात आलेली रुग्णांची संख्या ५ लाख ६१ हजार ९९८ इतकी झाली आहे. मुंबई रुग्णसंख्येसोबतच मृत्यूसंख्याही वाढत आहे. मुंबईत आज ५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असे असले तरी मुंबईत आज ९ हजार ३३ जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. मुंबईत आज ५० हजार ५३३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मुंबईतील कोरोना रुग्ण वाढत असले तरी कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ८२ टक्के इतका आहे. ९ एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंतचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर हा १.६० टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ९७ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर १ हजार १६९ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मुंबईची रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचा दरही अधिक आहे. मुंबईत आतापर्यंत ४ लाख ६३ हजार ३४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत मुंबईत ४८ लाख ५१ हजार ७५२ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

मुंबईमधील कंटेनमेंट दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. इमारतीनंतर आता चाळीत त्याचप्रमाणे झोपडपट्यांमध्ये देखिल कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. ग्रँड रोड, अंधेरी, मलबार हिल, भायखळा, कुर्ला या भागात सर्वाधिक इमारती सील करण्यात आल्या आहेत. मुंबईची रुग्णसंख्या दर आठवड्याला १० हजारांच्या जवळ पोहचते. त्यामुळे मुंबईकरांनी सर्वाधित काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: लॉकडाऊनचा परिणाम दिसेना! २४ तासांत ६३, ७२९ नव्या रुग्णांची नोंद

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -