Mumbai corona Update : मुंबईत पुन्हा कोरोना रुग्ण मृत्यूची नोंद शून्यच, कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार

Mumbai corona update168 corona patient found in mumbai and zero corona death
Mumbai corona Update : मुंबईत पुन्हा कोरोना रुग्ण मृत्यूची नोंद शून्यच, कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगाने घट होत आहे. मुंबईतही कोरोनाबाधितांची संख्या कधी १०० पेक्षा कमी तर जास्त अशी नोंद होत आहे. गेल्या २४ तासात मुंबईत १६८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद पुन्हा शून्य झाली आहे. मंगळवारी २ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार सातत्याने पाहायला मिळत आहे. पंरतु कोरोनाबाधितांच्या दगावण्याचे प्रमाण आटोक्यात आणण्यामध्ये मुंबई महानगरपालिकेला आणि आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण पूर्ण झाल्यामुळे अती जोखीमीच्या रुग्णांचा टक्का घसरला आहे.

मुंबईत गेल्या २४ तासात १६८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत १ लाख ५५ हजार ९६० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासात १५१ कोरोनाबाधितांना लक्षणे नाहीत. यातील १७ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईत सध्या १६ हजार ६९० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार २२८ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईत आतापर्यंत १ लाख ३५ हजार १६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा दरसुद्धा ३ हजार ७५८ दिवसांवर गेला असल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे आता निर्बंध शिथील करण्यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे. मुंबईतील ऑक्सीजनवर असणाऱ्या रुग्णांची संख्या ३९७ असून राज्यातील आणि मुंबईतील कोरोना परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे.


हेही वाचा : Nawab Malik Arrested : नवाब मलिक पीएमएलए कोर्टात दाखल, ईडीकडून कोठडी मागण्याची शक्यता