Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी corona virus: मुंबईत संपूर्ण नव्हे तर 'मिनी लॉकडाऊन' लागणार?, महापौर पेडणेकरांचे संकेत

corona virus: मुंबईत संपूर्ण नव्हे तर ‘मिनी लॉकडाऊन’ लागणार?, महापौर पेडणेकरांचे संकेत

Subscribe

मुंबईतील आणि राज्यात रुग्णालयातील डॉक्टर बाधित होत आहेत. बेस्टचे कर्मचारी बाधित होत आहे. रुग्णालयातील बेड रिकामे असल्यामुळे लॉकडाऊनच्या निर्णयापर्यंत पोहोचत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री तसेच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक होणार आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांची आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या मुंबईत २० हजारपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात वीकेंड लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतही शुक्रवारी संध्याकाळपर्यंत निर्बंधांची घोषणा होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनबाबत चर्चा सुरु असताना मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन लागणार नसल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मुंबईत मिनी लॉकडाऊन करण्यात येईल असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा करत आहेत. अशी माहिती महापौर पेडणेकरांनी दिली आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुंबईतील लॉकडाऊनबाबत माहिती दिली आहे. महापौर पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईत २० हजार १८१ रुग्ण आहेत. त्यामध्ये लक्षणे नसणारी पण बाधित आहेत असे १७ हजारपेक्षा अधिक रुग्ण आहेत. जर टक्केवारी वाढली तर आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. आजही असं वाटत आहे की, मुंबईकरांनी घाबरण्यापेक्षा दुसरी लाट जशी रोखली तसेच राज्य सरकारने जे नियम लागू केलेत ते पाळून तिसरी लाट रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे महापौर पेडणेकर म्हणाल्या आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना परिस्थितीवर चर्चा करत आहेत. देशपातळीवर चर्चा करत आहेत. महानगरपालिकांच्या आयुक्तांशी चर्चा करुन मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत. लोक घाबरले आहेत संपूर्ण लॉकडाऊन होईल का, आजच्या घडीला संपूर्ण लॉकडाऊन होणार नाही. परंतु बेफिकीरपणे काही नागरिक वागत राहिले तर कोरोना रुग्णांची संख्या वाढेल. १०० मधील १० टक्के लोकं नियम पाळत नाही आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माझे कुटुंब माझी जबाबदारी असे सांगितल्याप्रमाणे केले तर या लाटेला थोपवू शकतो असं महापौर म्हणाल्या आहेत.

मुंबईतील आणि राज्यात रुग्णालयातील डॉक्टर बाधित होत आहेत. बेस्टचे कर्मचारी बाधित होत आहे. रुग्णालयातील बेड रिकामे असल्यामुळे लॉकडाऊनच्या निर्णयापर्यंत पोहोचत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री तसेच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत निर्बंधांवर चर्चा होईल. शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस असल्यामुळे मुंबईत येणारे-जाणाऱ्यांची संख्या वाढते. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. परंतु मुख्यमंत्री यावर संध्याकाळी ७ वाजेपर्यंत निर्णय घेतील. धोक्याची पातळी वेळीच रोखावी अशा पद्धतीने मुख्यमंत्री निर्णय घेतील. अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.


- Advertisement -

हेही वाचा : coronavirus india : कोरोनाची त्सुनामी! देशात 7 महिन्यानंतर रुग्णसंख्या 1 लाखांच्या पुढे

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -