घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईतील रुग्णसंख्या वाढली, आज ३,६७१ नव्या रुग्णांची नोंद तर...

Mumbai Corona Update: मुंबईतील रुग्णसंख्या वाढली, आज ३,६७१ नव्या रुग्णांची नोंद तर शून्य मृत्यू

Subscribe

मुंबईकरांना इथून पुढे सर्वाधिक काळजी घेण्याची गरज आहे कारण मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आजही मुंबईत धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. मुंबईत आज ३ हजार ६७१ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हीच संख्या २ हजार ५१० इतकी होती. मात्र २४ तासात १ हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. वर्षाच्या शेवटी वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे. मुंबईत आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या बाधित रुग्णांची संख्या ही ७ लाख ७९ हजार ४७९ इतकी झाली आहे.

मुंबईतील बाधित रुग्णांची संख्या आज वाढली असली तरी मुंबईत आज शून्य मृत्यू नोंद करण्यात आली आहे. मुंबईत आज एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. मुंबईतील रुग्ण बरा होण्याचा दर हा ९६ टक्के इतका आहे. मुंबईतील मृत्यू दर सध्यातरी शून्य आहे. मागचे दोन दिवस मुंबईत केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

त्याचप्रमाणे मुंबईत आज ३७१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. काल हीच संख्या २५१ इतकी होती. मुंबईत आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही ७ लाख ४९ हजार १५९ इतकी आहे. मुंबईत आज एकूण ४६ हजार ३३७ कोरोना चाचण्या करण्यात आल्यात त्यातील ३ हजार ६७१ रुग्णांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. मुंबईत सध्या ११ हजार ३६० अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

राज्यात गुरुवारी ५ हजार ३६८ नवे बाधित 

राज्यात गुरुवारी ५ हजार ३६८ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज राज्यातील रुग्णसंख्या १ हजार ४६८ ने वाढली आहे. तर १ हजार १९३ रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर हा ९७.५५ टक्के इतका आहे. तर राज्यात आज एकूण २२ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा २.१२ टक्के इतका आहे. राज्यात सध्या १८ हजार २१७ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

निर्बंध कठोर करणार  

मुंबईसह राज्याभरात कोरोना आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्याची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्ससोबत बैठक घेतली. तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचे सांगितले आहे. राज्यातील रुग्णसंख्या दुप्पट होण्यास सुरुवात झाली असून नागरिकांनी स्वत:ची योग्य काळजी घेण्याचे आवाहन राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आले आहे. तसेच राज्यातील निर्बंध कठोर करण्याचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांशी बोलून घेण्यात येणार आहे असे देखील ते म्हणाले.

ठाण्यातील आजचा पॉझिटिव्हीटी रेट हा ५.२५ टक्के इतका आहे. तर रायगड ४ टक्के, पालघर ३ पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट ४.१४ इतका आहे. एका दिवसात रुग्णसंख्या दुप्पट होणारी परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. यावर काय उपाय करता येतील यासंबंधी सविस्तर चर्चा झाली आहे. यासंबंधीचा अंतिम निर्णय २ दिवसात मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टापे यांनी दिली आहे. शाळा बंद न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांना बॅचेसमध्ये लसीकरण केंद्रावर घेऊन जावे. यामुळे लसीकरणाला वेग येईल आणि शाळा देखील बंद राहणार नाहीत, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोना दुप्पट होणाऱ्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील निर्बंध आणखी कठोर करण्याची शक्यता आहे. मुंबईत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्टांवर निर्बंध लावण्यात आले असून ३० डिसेंबर ते ७ जानेवारी पर्यंत सेलिब्रेशन करण्यासाठी कोणत्याही खुल्या जागी जमण्यास मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी घरीच नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करावे असे आवाहन मुंबई पालिकेकडून करण्यात आले आहे.


हेही वाचा – ओमायक्रॉनमुळे नाशिक शहरात मनाई आदेश

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -