घरमुंबईमुंबईकरांनो घरातच राहा! उरले फक्त १५ Ventilator बेड आणि ४१ ICU बेड

मुंबईकरांनो घरातच राहा! उरले फक्त १५ Ventilator बेड आणि ४१ ICU बेड

Subscribe

मुंबईतील आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर

मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केल्याने आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडली आहे. यात कोरोना रुग्णसंख्याही दिवसागणिक अधिक वाढत असल्याने रुग्णालयांची वाईट अवस्था झाली आहे. मुंबईत सध्या केवळ १५ व्हेंटिलेटर आणि ४१ आयसीयू बेड शिल्लक असल्याने आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर आली आहे. मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत असून मुंबईचा कोरोना पॉझिटिव्ह दर हा ११.१९ वर पोहचला आहे. त्यामुळे रुग्णालयात रोज नव्या भर्ती होणाऱ्या कोरोना रुग्णांना बेड्स पुरवायचे कसे असा प्रश्न रुग्णालयांसमोर निर्माण झाला आहे.

पालिकेच्या डॅशबोर्डवरील आकडेवारीनुसार, १४ एप्रिल रोजी मुंबईत एकूण २६६४ आयसीयू बेडसपैकी केवळ ४१ आयसीयु बेड्स रिक्त आहेत, तर यातील २६२३ बेड्सवर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १३३९ व्हेंटिलेटरस् बेडपैकी आत्ता १५ व्हेंटिलेटस् मुंबईत शिल्लक राहिले आहे. तर १३२४ व्हेंटिलेटर बेड्सवर रुग्ण उपचार घेत आहेत. १०,३६१ ऑक्सिजन बेड्पैकी सध्या १४४४ ऑक्सिजन बेड्स शिल्लक राहिले आहेत. तर ८९१७ ऑक्सिजन बेडवर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे मुंबईतील उपलब्ध बेड्सची सुविधा रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी पडत आहे. दररोज वाढती रुग्णसंख्या पाहता गंभीर रुग्णांचा बेड्सचा तुटवडा जाणवू शकतो. डिसीएचसी, डिसीएच आणि सीसीसी १ रुग्णालय मिळून एकूण २५ हजार ४५५ बेड्स असून यातील २० हजार २५६ बेड्स १३ भरले आहेत. तर केवळ ५१९९ हून कमी बेड्स रिक्त असल्याची माहिती पालिकेच्या डॅशबोर्डवर देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतही कोरोनामुळे रुग्णालातील परिस्थिती अगदी वाईट झाल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

दरम्यान मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या आता ८६ हजार ८६६ वर पोहचली आहे. यातील १५ हजार ९१४ रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळत असून १२९४ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे अशा रुग्णांना सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही बेड्स उपलब्ध करुन देण्यात अडचणी येत आहेत. या एकूण रुग्णंसंख्येपैकी ६९,६५८ रुग्णांमध्ये लक्षणे आढळली नाहीत, त्यामुळे आयसीयूची गरज नसलेल्या आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी पालिका तारांकित हॉटेल्समध्ये क्वारंटाइन बेड्स उपलब्ध करुन देणार आहे. मात्र याचा खर्च संबंधित रुग्णाला द्यावा लागणार आहे.

परंतु हॉटेल्समध्ये क्वारंटाइनपेक्षा रुग्णालयात क्लारंटाइन राहणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे असे रुग्णांना वाटते. त्यामुळे मुंबईतील बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये आयसीयूची आवश्यकता नसतानाही लक्षणे नसलेले अनेक रुग्ण निगेटिव्ह रिपोर्ट येईपर्यंत बेड्स अडवून ठेवत असल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी आयसीयूची आवश्यकता असलेल्या रुग्णाला तात्काळ बेड उपलब्ध न झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक रुग्णालयांमध्ये धावपळ करावी लागत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे गरज आयसीयूची गरज नसलेल्या रुग्णांसाठी बीकेसीतील फाइव्ह स्टार हॉटेल ट्रायडंट आणि मरीन ड्राईव्हच्या क्वांटिनेंटल हॉटेलमध्ये प्रत्येकी ५० बेड्स क्वारंटाइनसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

- Advertisement -

तसेच मुंबईत अति गंभीर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चार दिवसांमध्ये २०० व्हेंटिलेटरसह आयसीयू बेड्स उपल्बध करुन देणार आहे. तसेच येत्या दोन दिवसांमध्ये दहिसर जम्बो कोविड सेंटरमध्ये २५, सेव्हन हिल्समध्ये ३४ आणि कूपरमध्ये ४० आयसीयू बेड्स देणार आहोत असे येत्या आठ दिवसात एकूण ३०० आयसीयू बेड्स उपलब्ध करणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

जसलोक हॉस्पिटल होणार कोरोना हॉस्पिटल

मुंबईतील जसलोक रुग्णालय आता संपूर्ण कोरोना रुग्णालय करण्यात येणार आहे. जसलोक रुग्णालयामध्ये कोरोनासाठी २५० बेड आणि ४० आयसीयू बेड कोरोनासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. सेव्हन हीलमध्ये देखील ४० हुन अधिक आयसीयू बेड वाढवले


हेही वाचा- Maharashtra lockdown 2021 : कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -