Saturday, February 20, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईत सर्वांसाठी लोकल सुरु केल्याने रुग्ण वाढल्याची शक्यता; टास्क फोर्सच्या सदस्याचं मत

मुंबईत सर्वांसाठी लोकल सुरु केल्याने रुग्ण वाढल्याची शक्यता; टास्क फोर्सच्या सदस्याचं मत

Related Story

- Advertisement -

मुंबईत सर्वांसाठी लोकल सुरु केल्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढले, अशी शक्यता टास्क फोर्सचे सदस्य शशांक जोशी यांनी व्यक्त केली. गेले काही दिवस मुंबईतील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. डिसेंबर-जानेवारी महिन्यात दरदिवसाला होणारी कोरोनाची रुग्णांची वाढ नियंत्रणात होती. मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

सर्वसामान्यांसाठी १ फेब्रुवारीपासून लोकल सेवा सुरु करण्यात आली. त्यानंतर जानेवारीमध्ये दर दिवसाला साडे तीनशे-चारशेच्या जवळपास वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात ८०० पर्यंत वाढते आहे. सर्वसामान्य लोकांसाठी लोकल मर्यादित वेळेत जरी सुरु करण्यात आली आहे. असं असलं तरी प्रवाशांची संख्या २० लाखाहून ३५ लाखांपर्यंत पोहोचली. तर दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण देखील वाढत आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाचे रुग्ण वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात सर्वांसाठी लोकलसेवा सुरु करणे हे सुद्धा एक कारण आहे, असं डॉ. सशांक जोशी यांनी सांगितलं.

मुंबईतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात – सुरेश काकाणी

- Advertisement -

मुंबईतील कोरोनाची स्थिती ही नियंत्रणात आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊन लागू करण्याची गरज नाही, असं मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितलं. यावेळी त्यांनी सर्वांनी कोरोना संबंधीचे सर्व नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, इमारतींमध्ये पाच आणि त्यापेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत, त्या इमारती सील केल्या जात आहेत.

buildings sealed

- Advertisement -

- Advertisement -