घरताज्या घडामोडीमुंबईचा अर्थसंकल्प वाढला, महसूल कसा वाढणार?

मुंबईचा अर्थसंकल्प वाढला, महसूल कसा वाढणार?

Subscribe

मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी महापालिका आर्थिक संकटात असतानाही वाढीव ३३ हजार ४४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. परंतु महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर, विकास नियोजन शुल्क, गुंतवणुकीवरील व्याज, तसेच शासनाकडून मिळणारे अनुदान आदींमधून मिळणारा महसूल अजुनही १० हजार कोटींनी कमी आहे. त्यामुळे महापालिकेचा महसूल पुर्णपणे घटलेला असताना, अर्थसंकल्प वाढीव बनवण्यात आला असला तरी पुढील धोका कायम आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध कर आणि शुल्कांमधून चालू अर्थसंकल्पात २४ हजार ९८३ कोटींचा महसूल अपेक्षित होता. परंतु महापालिकेने सन २०१९-२०चा सुधारीत अंदाज २३ हजार ८४६ कोटी रुपये एवढा केला. मात्र, डिसेंबर २०२० पर्यंत हा महसूल १४ हजार ८२८ कोटी रुपये वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील अपेक्षित महसूल आणि वसूल झालेला महसूल पाहता आजही १० हजार कोटींचा फरक दिसून येत आहे. जानेवारी महिन्यात यातील थोडाफार महसूल जमा झाला असला तरी प्रत्यक्षात फेब्रुवारी आणि ३१ मार्च २०२०पर्यंत हे लक्ष्य निम्म्यापेक्षा जास्त गाठता येणार नाही. त्यामुळे महापालिकेचे सुमारे चार ते साडेचार हजार कोटींचा महसूल यंदा कमी होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

म्हाडा विकास प्राधिकरण स्वतंत्र झाल्याने महापालिकेचे उत्पन्न कमी झाले आहे. तसेच फंजिबल पोटीही महापालिकेचा हिस्सा कमी झालेला आहे. याशिवाय महापालिकेच्या भूभागावर राबण्यात येणार्‍या एसआरए योजनांमधून २५ टक्के अधिमुल्यांपोटी ६१८ कोटी रुपये येणे प्रलंबित आहेत. तसेच म्हाडा आण एसआरएकडून विकास शुल्कांच्या माध्यमातून येणारा उत्पन्नाचा हिस्सा कमी झालेला आहे.

महापालिकेचा प्रस्तावित कर आणि वसूल कराची आकारणी

उत्पन्नाचे स्त्रोत           महसुलाचा अंदाज           प्रत्यक्ष वसुली           २०२१-२१ ची तरतूद

जीएसटी                   9073.28 कोटी             6795.54 कोटी        9799.15 कोटी
मालमत्ता कर              5016.19 कोटी            1810.37 कोटी         6768.58 कोटी
डि.पी शुल्क              3453.64 कोटी            2067.88 कोटी         3879.51 कोटी
गुंतवणुकीवरील व्याज     2332.36 कोटी            1625.85 कोटी         1828.13 कोटी
जल व मलनि:सारण कर 1459.13 कोटी            911.23 कोटी           1535.88 कोटी
राज्य शासन अनुदान      446.56 कोटी             17.50 कोटी             1266.73 कोटी
देखभाल आकार           674.55 कोटी             268.35 कोटी           796.11 कोटी

- Advertisement -

इतर                        2528.11 कोटी           1331.35 कोटी          2574.21 कोटी
एकूण                      24983.82 कोटी          14828.07 कोटी       28448.30 कोटी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -