घरमुंबईमुंबईकरांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी; 'या' महिन्यात होणार मुंबई 'Unlock'?

मुंबईकरांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ महिन्यात होणार मुंबई ‘Unlock’?

Subscribe

'जर मुंबईकरांनी काटेकोरपणे नियमांचे पालन केले, मास्क वापरला तर लवकरच कोरोनावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. जर असे झाले तर फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुंबई पूर्णपणे अनलॉक करता येईल'

राज्याची राजधानी मुंबईला कोरोनाने विळखा घातला आहे. मुंबई सारख्या मोठ्या शहरात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाची लाट आल्याचे बोलले जात होते. मात्र त्यावर मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी उत्तर दिले आहे. मुंबईकरांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्यास फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुंबई पूर्णपणे अनलॉक करता येईल, असा दिलासादायक दावा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला आहे.

…तर लवकरच कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य

दरम्यान, मुंबईत सध्या अनलॉकमुळे अटी काही शिथिल करण्यात आल्या आहे. पण लोकं अजूनही जबाबदारीने वागत नाही. अनेक ठिकाणी लोकं मास्क न घालताच वावरत असून हे अत्यंत चिंताजनक आहे. मुंबई कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनीही जबाबदारीने वागण्याचे गरजेचं आहे. जर मुंबईकरांनी काटेकोरपणे नियमांचे पालन केले, मास्क वापरला तर लवकरच कोरोनावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. जर असे झाले तर फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुंबई पूर्णपणे अनलॉक करता येईल, असेही चहल यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबईत आता कोरोनाची दुसरी लाट येणार नाही

मुंबईत टेस्टिंगचे प्रमाण वाढवले असल्यानेच रुग्णसंख्या वाढत असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल म्हणाले. तसेच महापालिकेने जीम आणि रेस्टराँट मालकांशी चर्चा केली असून काही अटींसह त्यांनी परवानगी देण्याचा विचार सुरु असल्याची माहिती इक्बाल चहल यांनी दिली आहे. तसेच शहरात करोनाची दुसरी लाट अजिबात आलेली नाही. मुंबईत आधीच्या सात हजारांच्या तुलनेत सध्या दिवसाला १५ हजार चाचण्या होत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. महापालिकेने जाणीवपूर्वक टेस्टिंग दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आपली आरोग्य यंत्रणा नव्या रुग्णांची काळजी घेऊ शकते याची खात्री होती. याआधी दिवसाला सात हजार चाचण्यांमागे ११०० करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. पण आता टेस्टिंगची संख्या वाढवण्यात आली असल्याने ही संख्या २००० इतकी झाली आहे, असेही चहल म्हणाले.


WHO चा इशारा; कोरोनाचा फैलाव सुरू राहिल्यास लस येईपर्यंत २० लाख बळींची शक्यता
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -