Aryan Khan Bail Hearing: आर्यन खानसह इतर सात जणांची जेलमध्ये रवानगी, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Mumbai Court rejects bail pleas of Aryan Khan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha in the cruise ship drug case

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. मुंबईच्या किला कोर्टाने आर्यन खानसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता आर्यनसह इतर दोन्ही आरोपींची रवानगी आर्थररोड जेलमध्ये होणार आहे. परंतु आर्यनच्या जामिनासाठी उद्या, शनिवारी वकील सेशन कोर्टाकडे जाण्याची शक्यता आहे. (Mumbai Court begins hearing on bail pleas of Aryan Khan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha in the cruise ship drug case)

काल, गुरुवारी किला कोर्टाने आर्यनसह आठ जणांना १४ दिवसांसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर आर्यन खानसह इतर आरोपींचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे आज आर्यन खानसह इतर सात जणांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. ही सुनावणी आज सकाळपासून सुरू होती. यावेळी चौकशीसाठी आर्यन खानसह इतरांना जामीन देऊ नये, अशी मागणी एनसीबीच्या वतीने ASG अनिल सिंह यांनी केली होती. त्यानंतर आता किला कोर्टाने आर्यन खानसह इतर सात जणांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता यासर्व जणांची आर्थररोड जेलमध्ये रवानगी होणार आहे. पण उद्या आर्यन खानचे वकील सेशल कोर्टाकडे जाऊ शकतात असे म्हटले जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर २ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी एनसीबीने छापेमारी केली. या छापेमारीत क्रूझवर सुरु असलेली रेव्ह पार्टी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी उधळून लावली. यावेळी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह एकूण आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सोमवारी एका ड्रग्ज तस्कराला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील चौकशीत ड्रग्ज डील करण्यासाठी डार्कनेटचा वापर करत बिटकॉइन देऊन ड्रग्ज खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र चौकशीदरम्यान अनेक नवनवे खुलासे समोर येत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी लिंक असण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर वळण घेताना दिसत आहे.


हेही वाचा – Cruise Drug Case: जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान काय म्हणाला आर्यन खान?