घरCORONA UPDATECorona Update : मुंबईत ९१७ नव्या रुग्णांची नोंद; ४८ जणांचा मृत्यू

Corona Update : मुंबईत ९१७ नव्या रुग्णांची नोंद; ४८ जणांचा मृत्यू

Subscribe

४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ६ हजार ८९० वर पोहोचला आहे

मुंबईमध्येही दिवसेंदिवस रूग्णांची संख्येत वाढ होताना दिसतेय तर कालच्या तुलनेत कमी म्हणजेच आज ९१७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज ९१७ नवे कोरोना रूग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २५ हजार २३९ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ६ हजार ८९० वर पोहोचला आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुंबईमध्ये ९१७ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ३३ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३७ पुरुष तर ११ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ३ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. २५ जण हे ६० वर्षांवरील, तर २० जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाच्या १ हजार १५४ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ९९ हजार १४७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्के आहे. तर शहरात १८ हजार ९०५ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.


Corona Update: राज्यात ११,०८८ नव्या रुग्णांची नोंद, २५६ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -