Corona Update: मुंबईत कोरोनाचे १३०४ नवे रुग्ण, ५८ मृत्यू!

Mumbai Corona Update 2510 corona patients registered in mumbai today
Mumbai Corona Update: ब्रेकिंग! मुंबईत बुधवारी २,५१० नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले

मुंबईमध्ये १३०४ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २२ हजार ३३१ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ६७४८ वर पोहचला आहे.

मुंबईमध्ये १३०४ नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ४१ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३७ पुरुष तर २१ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील २ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ४३ जण हे ६० वर्षांवरील, तर १३ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

मुंबईत कोरोनाच्या १४५४ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ९५ हजार ३५४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के आहे. तर शहरात १९ हजार ९३२ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.


हे ही वाचा – देशात कोरोनामुळे २०० डॉक्टरांचा मृत्यू, आयएएमनं पंतप्रधानांना लिहिलं पत्र!