घरताज्या घडामोडीसुशांत सिंह राजपूत प्रकरणी खोटी माहिती शेअर केल्यास अटक! दिल्लीत एकावर कारवाई!

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी खोटी माहिती शेअर केल्यास अटक! दिल्लीत एकावर कारवाई!

Subscribe

गेल्या ४ महिन्यांमध्ये दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून (Sushant Singh Rajput Death) मोठा गहजब उडाला आहे. या प्रकरणात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच राजकीय नेत्यांचीही नावे यात असल्याचं सांगितलं गेलं. त्यावरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आता या चर्चांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी खोटी माहिती सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या एका व्यक्तीला दिल्लीतून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. योगायोगाने बॉलिवूड अभिनेता अरबाज खान याने देखील याच व्यक्तीच्या विरोधात सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आपलं नाव गोवल्याची तक्रार करत मानहानीचा दावा ठोकला आहे. त्यामुळे आता सुशांत प्रकरणाशी संबंधित काहीही सोशल मीडियावर शेअर करताना अधिक सतर्क राहावं लागणार आहे!

विभोर आनंदची वैद्यकीय चाचणी सुरू

मुंबई पोलिसांनी दिल्लीमध्ये कारवाई करत विभोर आनंद नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. मुंबई पोलिसांसोबतच बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातल्या अनेकांचा या प्रकरणात सहभाग असल्याचं सांगत सोशल मीडियावर त्यांची बदनामी केल्याचा आरोप विभोरवर ठेवण्यात आलेला आहे. ‘आम्ही गुरुवारी रात्री विभोरला दिल्लीतून अटक केली आहे. त्याला आता मुंबईत आणण्यात आलेलं असून त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. त्यात कोरोनाची चाचणी देखील केली जाणार आहे. त्यानंतर त्याची चौकशी केली जाईल’, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

विभोरनं घेतली होती अनेकांची नावं

‘विभोरने सुशांत सिंह राजपूत मृत्यू (Sushant Singh Rajput Death) प्रकरणावरून अनेक प्रकारच्या थिअरी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. तसेच, त्याने अनेक लोकांवर सुशांतच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप ठेवला होता. त्याशिवाय मुंबई पोलिसांच्या तपासावर देखील त्याने शंका उपस्थित केल्या होत्या’, असं देखील क्राईम ब्रांचकडून सांगण्यात आलं आहे.

नुकतीच मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणात मुंबई पोलीसांना बदनाम करणारी ८० हजारांहून जास्त फेक सोशल मीडिया अकाऊंट्स असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. अशा सर्व व्यक्तींविरोधात कारवाई करण्यासाठी सायबर क्राईम विभागानं सुरुवात केली असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -