Homeक्राइमMumbai Crime : सीएसएमटीत व्यापाऱ्यावर गोळीबार, पोलिसांकडून दोघांना अटक

Mumbai Crime : सीएसएमटीत व्यापाऱ्यावर गोळीबार, पोलिसांकडून दोघांना अटक

Subscribe

सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास एका व्यापाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. अंगडीया नावाच्या व्यापाऱ्यावर हा गोळीबार करण्यात आला असून सीएसएमटी येथील सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळील डिमेलो परिसरात ही घटना घडली.

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. ज्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच सोमवारी (ता. 06 जानेवारी) रात्री 10 वाजताच्या सुमारास एका व्यापाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. हा व्यापारी अंगडीया असून सीएसएमटी येथील सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळील डिमेलो परिसरात त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अंगडीया यांच्यावर गोळीबार केला. या घटनेच्या 24 तासांमध्येच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai Crime Firing on shopkeeper in CSMT, two arrested by police)

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अंगडीया नामक व्यापारी सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळील डिमेलो परिसरात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमध्ये अंगडीया यांच्या पायाला गोळी लागली. तर, चोरांनी अंगडीया यांच्याजवळ असलेली मौल्यवान वस्तुंची बॅग घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत जखमी झालेले व्यापारी अंगडीया यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी अंगडीया यांच्यावर एकूण चार गोळ्या झाडल्या. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला करण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा… Iqbal Mirchi : गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांकडून मालमत्ता विक्रीचा प्रयत्न होताच ईडीनं…

या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर नगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर, या घटनेतील इतर तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. परंतु, 24 तासांच्या पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरा 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरीच्या उद्देशानेच आरोपींनी गोळीबार केला होता. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईसह राज्यात गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आरोपींना किंवा गुन्हेगारांना कायद्याचा किंवा पोलिसांचा धाक राहिलेला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Beed Murder : विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये नेमकं काय? कोठडीत चार दिवसांची वाढ; आमदार धसांनी केले गंभीर आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -