Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमMumbai Crime : टॉवेलने गळा आवळून पत्नीचा खून; मलबार हिल पोलिसांनी केली...

Mumbai Crime : टॉवेलने गळा आवळून पत्नीचा खून; मलबार हिल पोलिसांनी केली पतीला अटक

Subscribe

मुंबईच्या मलबार हिल परिसरात नवऱ्यानेच बायकोला चारित्र्याच्या संशयावरून ठार मारल्याचं प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

मुंबई : मुंबईच्या मलबार हिल परिसरात नवऱ्यानेच बायकोला चारित्र्याच्या संशयावरून ठार मारल्याचं प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. योगिता सुमीत वेदवंशी (25) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत महिलेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यांत सुमितला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. (mumbai crime murder of wife by strangulation with towel accused arrested by police)

योगिता पती सुमितसह मलबार हिल येथील कंबाला हिल हायस्कूल शेजारच्या शिवाजी नगरमध्ये पतीसोबत राहत होती. काही दिवसांपासून सुमित योगिताच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून त्यांच्यात सतत भांडण होत होती. काही दिवसांपूर्वी योगिताने तिच्या एका मित्राकडे तिचे सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते. ही माहिती अलीकडेच सुमीतला समजली होती. त्यातून त्यांच्यातील वाद अधिकच वाढले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Crime : गॅस कटरने खिडकी कापली, बँकेत प्रवेश केला अन् चोरट्यांचा जवळपास 14 कोटींच्या सोन्यावर डल्ला

मंगळवारी रात्री उशिरा याच कारणावरुन त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. याच वादातून त्याने योगिताची गळा आवळून हत्या केली होती. हा प्रकार नंतर तिची आई लक्ष्मी नाडलला समजताच तिने घटनास्थळी धाव घेतली होती. योगिताला जवळच्या एलिझाबेथ रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. ही माहिती नंतर रुग्णालयातून मलबार हिल पोलिसांना देण्यात आली होती. याप्रकणी लक्ष्मी नाडलच्या जबानीवरुन पोलिसांनी तिचा जावई सुमीत वेदवंशीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता.

- Advertisement -

लक्ष्मी सुरेश नाडल यांनी सुमितवर आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. लक्ष्मी म्हणाल्या की, सुमितने यापूर्वी योगिताचे दागिने अभिषेक नावाच्या मित्राला दिले होते आणि त्यांच्यात सतत भांडणे होत होती. तसेच चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद व्हायचे. खुनाच्या दिवशीही असाच वाद झाला आणि सुमितने रागाच्या भरात पत्नीला मारहाण केली. त्यानंतर टॉवेलने तिचा गळा आवळला.

गुन्हा दाखल होताच त्याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. (mumbai crime murder of wife by strangulation with towel accused arrested by police)

हेही वाचा – Shivaji Maharaj Statue : पुतळा दुर्घटनेप्रकरणी आरोपी चेतन पाटीलला जामीन मंजूर


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -