Homeक्राइमMumbai Crime News : अंगडियावर गोळीबार करून बॅग लुटणारे असे सापडले पोलिसांच्या...

Mumbai Crime News : अंगडियावर गोळीबार करून बॅग लुटणारे असे सापडले पोलिसांच्या जाळ्यात

Subscribe

पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार केली. लुटण्यात आलेल्या बॅगमध्ये विशेष जीपीएस चिप बसवण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले. या चिप आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस या चोरट्यांपर्यंत पोहोचले.

(Mumbai Crime News) मुंबई : सेंट जॉर्ज परिसरात अंगडियावर गोळीबार करून लुटमार करणाऱ्या चारपपैकी दोन चोरट्यांना पोलिसांनी 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्या. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि एका खास बॅगेच्या मदतीने या चोरट्यांचा माग काढला. या बॅगेत लाखो रुपये किमतीचे मौल्यवान दागिने होते. (Angadia robber caught in police net due to special bag)

मुंबई पोलिसांनी लाखोंच्या दागिन्यांच्या चोरीचा गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी खास बॅगच्या सहाय्याने दरोड्याची ही घटना उघडकीस आणली. प्रत्यक्षात चोरट्यांनी लंपास केलेल्या दागिन्यांनी भरलेल्या बॅगमध्ये जीपीएस ट्रॅकिंग चिप बसवण्यात आली होती. या जीपीएस ट्रॅकिंग चिप आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले.

- Advertisement -

हेही वाचा – Delhi Election 2025 : आप विरुद्ध काँग्रेस लढाई; ठाकरे गट, तृणमूल, सपाकडून केजरीवालांची पाठराखण

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना सोमवारी रात्री घडली. एक अंगडिया आपल्या पुतण्यासोबत एका बॅगेत सुमारे 42 लाख रुपयांचे दागिने घेऊन दुचाकीवरून जात होता. हे दोघेही डी-मेलो रोडवर सेंट जॉर्ज हॉस्पिटलजवळ पोहोचताच चार अज्ञातांनी त्यांना अडवून बेदम मारहाण केली आणि दागिन्यांनी भरलेली बॅग घेऊन चौघांनी पळ काढला. पळ काढत असताना चोरट्यांपैकी एकाने दोघांवर गोळीबार केला. त्यात अंगडिया जखमी झाला, त्याच्या पायाला गोळी लागल्याचे त्याने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

- Advertisement -

त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार केली. लुटण्यात आलेल्या बॅगमध्ये विशेष जीपीएस चिप बसवण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले. या चिप आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस या चोरट्यांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी मंगळवारी पहाटे एका आरोपीला लोकमान्य टिळक मार्गावर तर दुसऱ्याला डोंगरी परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी या आरोपींकडून 16.50 लाख रुपयांचे दागिनेही जप्त केले आहेत. अन्य दोन आरोपींचा पोलिस अद्याप शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईसह राज्यात गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आरोपींना किंवा गुन्हेगारांना कायद्याचा किंवा पोलिसांचा धाक राहिलेला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (Mumbai Crime News : Angadia robber caught in police net due to special bag)

हेही वाचा – Santosh Deshmukh Murder : नैतिकतेच्या आधारे 5 मुख्यमंत्र्यांसह 10 मंत्र्यांनी दिले होते राजीनामे, मुंडेंचा गॉडफादर कोण?

Manoj Joshi
Manoj Joshi
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -