Homeक्राइमMumbai Crime : चोरीच्या गुन्ह्यातील सेल्समनला अटक, मालाड पोलिसांची कारवाई

Mumbai Crime : चोरीच्या गुन्ह्यातील सेल्समनला अटक, मालाड पोलिसांची कारवाई

Subscribe

चोरीच्या गुन्ह्यातील एका सेल्समनला मालाड पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. श्रवण भैरुसिंग राजपूत असे या आरोपीचे नाव असून तो मालाडच्या मणिरत्न ज्वेलर्समध्ये सेल्समन म्हणून कामाला होता.

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता चोरीच्या गुन्ह्यातील एका सेल्समनला मालाड पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. श्रवण भैरुसिंग राजपूत असे या आरोपीचे नाव असून तो मालाडच्या मणिरत्न ज्वेलर्समध्ये सेल्समन म्हणून कामाला होता. काम करताना त्याने पावणेआठ लाखांचे आठ किलो चांदीचे कॉईन केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून लवकरच चोरीचे सर्व कॉईन हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. (Mumbai Crime Salesman arrested in theft crime, Malad police action)

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार अंधेरी येथे राहत असून ते ज्वेलर्स व्यापारी आहे. त्यांचा मालाड येथे मणिरत्न नावाचे ज्वेलरी शॉप असून या शॉपमध्ये त्यांचा एक पार्टनर आहे. याच शॉपमध्ये आरोपी श्रवण हा गेल्या वर्षभरापासून सेल्समन म्हणून काम करत होता. चार दिवसांपूर्वी ते दोघेही त्यांच्या शॉपमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत होते. यावेळी त्यांना श्रवण हा शॉपमध्ये साफसफाई करताना ड्रॉव्हरमधील चांदीचे कॉईन चोरी करत असल्याचे दिसून आले होते. या प्रकारानंतर त्यांनी 10 ते 15 दिवसांचे सीसीटीव्ही तपासले. यावेळी त्यांना पुन्हा श्रवण हा चांदीचे कॉईन चोरी करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी चांदीच्या कॉईनच्या स्टॉकची पाहणी केली होती. त्यात त्यांना पावणेआठ लाखांचे आठ किलो वजनाचे चांदीचे कॉईन चोरीस गेल्याचे समजले.

हेही वाचा… Water Supply Issue : मुंबई, ठाणे, भिवंडीत दोन दिवस 15 टक्के पाणी कपात

हा प्रकार लक्षात येताच दुकानातील मालकांनी श्रवणविरुद्ध मालाड पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद होताच श्रवण राजपूतला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने चांदीचे कॉईन चोरीची कबुली दिली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून चोरीचे कॉईन लवकरच हस्तगत केले जाणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


Edited By Poonam Khadtale