घरमुंबईतीन कोटींचे ड्रग्ज हस्तगत; दोघांना अटक

तीन कोटींचे ड्रग्ज हस्तगत; दोघांना अटक

Subscribe

अंधेरीत ३ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत होणाऱ्या मोठ्या प्रमाणात पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबईची नाकेबंदी केली होती. या दरम्यान अंबोली पोलिसांनी रविवारी रात्री अंधेरीमध्ये तीन कोटींच्या ड्रग्जची तस्करी करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांसाठी हे ड्रग्ज आणण्यात आले असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. मात्र हे ड्रग्ज कोणाला पुरविले जाणार होते याबाबत चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मोहम्मद इस्माईल गुलामहुसेन (४५) आणि दयानंद माणिक मुद्दानर (३२) अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी हे ड्रग्ज हैदराबादहून आणले असल्याची माहिती चौकशी दरम्यान समोर आले आहे.

पार्ट्यांसाठी मुंबईत ड्रग्ज होतात दाखल

३१ डिसेंबरला मुंबईत मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. या पार्ट्यांसाठी विविध मार्गाने मुंबईत ड्रग्ज येण्याची शक्यता असते. त्यानुसार अंधेरीच्या अगरवाल इस्टेट रोड परिसरात काही व्यक्ती ड्रग्ज विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती अंबोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक दया नायक यांना मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त परमजित सिंग दहिया, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दया नायक यांच्या पथकाने मध्यरात्री या ठिकाणी सापळा लावून त्यांना दोन संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्या दोन आरोपींची अंगझडती करण्यात आली असता त्यांच्याकडे ३ कोटी ४ लाख रुपये किंमतीचा इफिड्रीन ड्रग्जचा साठा सापडल्याची माहिती अतिरिक्त पोली, आयुक्त मनोजकुमार शर्मा यांनी दिली आहे.

- Advertisement -

वाचा – जोगेश्वरीत ड्रग्ज तस्कराला अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -