Mumbai cruise drug bust case: आज पुन्हा चार आरोपींची ११ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडीत रवानगी

Mumbai cruise drug bust case four more sent to ncb custody till 11 October
Mumbai cruise drug bust case: आज पुन्हा चार आरोपींची ११ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडीत रवानगी

मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात आज पुन्हा सकाळी चार जणांना अटक केली आहे. या आरोपींची नावे अब्दुल कादिर शेख, श्रेयस नायर, मनीष दायरा, अवीन साहू असे असून त्यांना एस्प्लेनेड कोर्टने ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. दरम्यान आज सायंकाळी पाच वाजता आणखीन चार जणांना ताब्यात घेतले असून उद्या त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात ड्रग्ज पेडलर्स आणि एक प्रवाशासहित चार लोकांना अटक केली आहे. ज्यामध्ये बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला रविवार अटक करण्यात आली होती. रविवारी क्रूझ मुंबईत परल्यानंतर अनेक आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणात आतापर्यंत एकूण १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

काल, सोमवारी याप्रकरणातील आरोपी आर्यन खानसह आठ जणांना ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली. त्यानंतर आज दिवसभरात एकूण आठ जणांचा अटक करण्यात आली आहे. यापैकी चार जणांचा आज कोर्टात हजर करून ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत रवानगी केली असून उर्वरित चार जणांना उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे.

दरम्यान एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे म्हणाले की, ‘अनेक तपास केल्यानंतर आम्ही पश्चिम उपनगरातून एक ड्रग्ज तस्करी श्रेयस नायर आणि जोगेश्वरी भागातून एका ड्रग्ज पेडलरला अटक केले आहे. दुसऱ्या ड्रग्ज पेडलरचे नाव ऑपरेशन सुरू असल्यामुळे खुलासा केला जाऊ शकत नाही. तो जास्तीत जास्त आपला ड्रग्ज व्यवसाय क्रिप्टो करेंसीच्या माध्यमातून सुरू होता आणि डार्क नेटचा वापर करत होता.


हेही वाचा – Mumbai cruise drug bust case: ड्रग्जच्या सौदेबाजीसाठी कोड वर्डचा वापर, आर्यनच्या मोबाईलमध्ये धक्कादायक माहिती