घरमुंबई'आर्ची'साठी मुंबईच्या डबेवाल्यांनी असा घेतला बाळंतविडा

‘आर्ची’साठी मुंबईच्या डबेवाल्यांनी असा घेतला बाळंतविडा

Subscribe

मराठमोठ्या पध्दतीने ते ब्रिटनला आर्चीसाठी भेट पाठवून देणार आहे. महाराष्ट्राची परंपरा आणि ब्रिटनच्या राजघराण्याशी ऋणानुबंध जपण्यासाठी ही खरेदी केली असल्याची माहिती डबेवाल्यांनी दिली.

मुंबईचे डबेवाले आणि ब्रिटनच्या राज घराण्याचं जुनं नातं आहे. त्यांचे नाते जगप्रसिध्द आहे. प्रिन्स चार्ल्स यांचे द्वितीय पुत्र प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेगन मर्केल यांनी राजपुत्राला जन्म दिला. नुकताच बाळाचे नाव ‘आर्ची’ ठेवण्यात आले. आर्चीच्या जन्मामुळे मुंबईच्या डबेवाल्यांना देखील तितकाच आनंद झाला. या आर्चीसाठी मुंबईच्या डबेवाल्यांनी बाळंतविड्याची खरेदी केली आहे.

हे दागिणे केले खरेदी

मुंबईच्या डबेवाल्यांनी आज घाटकोपरच्या सेजल ज्वेलर्समधून आर्चीसाठी दागिणे खरेदी केले. या दागिण्यांमध्ये चांदीचे वाळे, पैंजण, कंबरपट्टा, चैन तसंच सोन्याच्या हनुमानाचं पेंडटही खरेदी करण्यात आलं. मराठमोठ्या पध्दतीने ते ब्रिटनला आर्चीसाठी भेट पाठवून देणार आहे. महाराष्ट्राची परंपरा आणि ब्रिटनच्या राजघराण्याशी ऋणानुबंध जपण्यासाठी ही खरेदी केली असल्याची माहिती डबेवाल्यांनी दिली.

- Advertisement -

आजोबांकडून नातवाला भेट

दरम्यान, ब्रिटनचे प्रिन्स चार्लस यांच्या भेटीमुळे आम्हा डबेवाल्यांना एक अनोखी ओळख मिळाली. त्यांनी आमच्या कामाचे कौतुक केले आम्हाला जगभरात एक वेगळी ओळख मिळाली. प्रिन्स चार्ल्स आता आजोबा झाले आणि ब्रिटनच्या राजघराण्याला राजपुत्र मिळाला. याचा ज्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबाला आनंद झाला तसाच आनंद आम्हाला सुध्दा झाला. ज्याप्रमाणे आजोबा आपल्या नातवाला भेट देतात तसंच आमच्या या छोट्या नातवाला आशिर्वाद देण्यासाठी आम्ही भेट पाठवत असल्याचे डबेवाल्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईचे डबेवाले हे दागिणे आज ब्रिटिश काऊन्सिलमध्ये जाऊन देणार आहेत. हे दागिणे त्यांच्यामार्फत ब्रिटिश राजघराण्याला दिले जाणार आहेत.

प्रिन्स हॅरी आणि मेघनला पाठवला होता पोशाख

प्रिन्स हॅरी आणि मेघन यांच्या लग्न सोहळ्यात डबेवाल्यांनी आवर्जुन मराठमोळा आहेर त्यांना पाठवला होता. हॅरी साठी सलवार-कुर्ता फेटा तर मेघनसाठी पैठणीसाडी-चोळी पाठवली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -