बाळासाहेबांच्या ‘गुलमोहरा’चे पुनर्रोपण: पुन्हा बहरण्यास सज्ज

mumbai dadar shivaji park balasaheb thackeray planted tree fell gulmohar replanted

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे शिवाजी पार्क मैदानात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: रोपण केलेले गुलमोहराचे झाडं उन्मळून पडले. बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाजवळ हे झाड आहे. बाळासाहेबांनी खूप वर्षांपूर्वी हे रोप लावले होते. दरम्यान उन्मळून पडलेल्या या गुलमोहराच्या झाडाचे मुंबई महापालिकेच्या पथकाने यशस्वी पुनर्रोपण करत त्याला जीवदान देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा गुलमोहर आता पुन्हा पहिल्यासारखा बहरण्यास सज्ज झाला आहे.

पालिकेने कोसळलेल्या झाडाच्या पसरलेल्या फांद्या छाटल्या, त्यानंतर हायड्राच्या साहाय्याने कोसळलेले झाडं उचलून पुनर्रोपित करण्याच्या ठिकाणी नेले आहे. तसेत झाडाच्या मुळाशी खतयुक्त मातीचा लेप दिला आहे. यानंतर मातीतही खत मिक्स करत एका खड्यामध्ये झाडं पुनर्रोपित केले गेले.

हेही वाचा : दादरच्या स्मृतिस्थळावरील बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेले गुलमोहराचे झाड कोसळले

मुंबईत सतत कोसळणाऱ्या पावसामुळे झाडं पडण्याच्या घटना समोर आल्या. याच शिवाजी पार्क मैदानातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाजवळील गुलमोहराचे झाडही रविवारी रात्री उन्मळून पडले. हे झाड कोसळल्याने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचेही नुकसान झाले आहे.

स्मृतीस्थळाच्या संरक्षक जाळ्या, लाद्या, पाण्याचे पाईप, विजेची केबल यांचे नुकसान झाले आहे. यावेळी मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी स्मृतीस्थळाची पाहणी केली. यानंतर स्मृतिस्थळावरच हे झाड पुनर्रोपित करण्याच्या सूचना पेडणेकर यांनी दिल्या. साधारण 25 वर्षांपूर्वी हे झाड बाळासाहेबांनी लावल्याची माहिती शिवसेनेचे माहीम विधानसभा विभागप्रमुख महेश सावंत यांनी दिली आहे.


भारताला मंकीपॉक्सचा धोका? टास्क फोर्स तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घेऊ