घरमुंबईकुर्ल्यातील इमारत दुर्घटनेतील बळींची संख्या 19, बनावट ऑडिट उघडकीस

कुर्ल्यातील इमारत दुर्घटनेतील बळींची संख्या 19, बनावट ऑडिट उघडकीस

Subscribe

कुर्ला पूर्व नाईक नगर येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या जागेवर बांधण्यात आलेल्या 40 50 वर्षे जुन्या धोकादायक इमारतींपैकी एक इमारत सोमवारी रात्रीच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. दरम्यान इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान अद्यापही स्थानिक पोलीस, पालिका यंत्रणा, अग्निशमन दल आणि एनडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटनेनंतर एकूण 32 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती, मात्र जखमींपैकी आता 18 जण मृत झाले असून 14 जण जखमी अवस्थेत होते. या 14 पैकी आता 5 जण रुग्णालयात उपचार घेत असून तर उर्वरित 9 जणांना उपचार देऊन घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान या दुर्घटनाग्रस्त इमारतीचे बनावट ऑडिट रिपोर्ट तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

बनावट रिपोर्ट बनवणाऱ्या ऑडिटरवर कारवाई – आयुक्त

कुर्ला नेहरूनगर इमारत दुर्घटनेप्रकरणात आता ऑडिट रिपोर्ट बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धोकादायक असलेली इमारत दुरुस्त करता येऊ शकते, असे बनावट ऑडिट रिपोर्ट बनवण्यात आले होते. त्यामुळे आता ऑडिट रिपोर्ट बनवणाऱ्या ऑडिटरची चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे.

राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची आर्थिक मदत

राज्य सरकारकडूनही दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त करत मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ५ लाख रुपये मदत देण्यात येईल. तसेच, जखमींना शासकीय खर्चाने उपचार देण्यात येतील. अशी घोषणा केली आहे.

- Advertisement -

 

बंडखोर स्थानिक आमदार मंगेश कुडाळकरांकडूनही 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर

या दुर्घटनेनंतर आता कुर्ला मतदार संघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांनी या दुर्घटनेतील मृतांप्रती दु:ख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचा आर्थिक मदत जाहीर केली आहे, तर जखमींना प्रत्येकी 1 लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -