Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी राजधानी एक्स्प्रेस सुवर्ण महोत्सवी वर्षात; पश्चिम रेल्वेकडून स्पेशल व्हिडीओ शेअर

राजधानी एक्स्प्रेस सुवर्ण महोत्सवी वर्षात; पश्चिम रेल्वेकडून स्पेशल व्हिडीओ शेअर

Subscribe

भारतीय रेल्वेची मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला पन्नाशीची झाली आहे. मंगळवारी या राजधानी एक्स्प्रेसने 50 व्या वर्षात पदार्पण केले आहे.

भारतीय रेल्वेच्या मुंबई-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला पन्नास वर्षे पूर्ण झाली. मंगळवारी या राजधानी एक्स्प्रेसने 50 व्या वर्षात पदार्पण केले. भारताची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या दोन शहरांना जोडणारी तसंच, वेगवान आणि गारेगार प्रवास असलेल्या या एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यासाठी आजही अनेकजण उत्साही आहेत. दरम्यान राजधानी एक्स्प्रेसने 50 व्या वर्षात पदार्पण केल्यामुळे पश्चिम रेल्वेने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राजधानी एक्स्प्रेचा सुरूवातीचा काळ दाखवण्यात आला आहे.

भारतीय रेल्वेने 17 मे 1972 रोजी तत्कालीन बॉम्बे सेंट्रलवरून मुंबई-नवी दिल्ली मार्गावर राजधानी एक्स्प्रेस सुरू केली. या एक्स्प्रेसमुळे मुंबई ते दिल्ली प्रवास करणे सहज शक्य झाले. या राजधानी एक्स्प्रेपूर्वी मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी फ्रंटियर मेल आणि पश्चिम एक्स्प्रेससारख्या गाड्या चालवल्या जात होत्या. त्याआधी देशातील पहिली पूर्ण वातानुकूलित गाडी दिल्ली आणि हावडा (कोलकाता) दरम्यान चालविण्यात आली. त्यानंतर तीन वर्षांनंतर ही सेवा सुरू झाली.

- Advertisement -

या राजधानी एक्स्प्रेसमुळे मुंबई ते दिल्ली असा प्रवास 15 तास आणि 50 मिनिटांत पूर्ण करणे शक्य झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या वेळेत आणखी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, 1988 पर्यंत राजधानीला सर्वाधिक वेगवान म्हणजेच 120 किमी प्रतितास या गतीने चालणारी एक्स्प्रेस म्हणुन ओळखले जात होते. परंतु, सध्यस्थितीत भारतात आधुनिक स्वरूपातील वंदे भारत आणि काही शताब्दी गाड्या जलदगतीने धावत आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या चार वर्षांत रेल्वे रुळ अद्ययावत केल्यानंतर राजधानी एक्स्प्रेस प्रतितास 160 किमीच्या गतीने धावेल. त्यामुळे मुंबई ते दिल्ली अंतर हे 15 तासांवरून 12 तासांत कापता येईल.


हेही वाचा – …तर मराठवाडा आणि विदर्भात निवडणुका घ्या, सर्वोच्च न्यायालयाच्या राज्य निवडणूक आयोगाला सूचना

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -