HomeमुंबईMumbai : 54 आठवडे स्वच्छता मोहीम राबवूनही मुंबई अस्वच्छच...

Mumbai : 54 आठवडे स्वच्छता मोहीम राबवूनही मुंबई अस्वच्छच…

Subscribe

गेल्या 54 आठवड्यापासून मुंबईत स्वच्छता मोहीम सुरू आहे. मात्र अद्यापही मुंबई स्वच्छ का होत नाहीये, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.

मुंबई : राज्यातील मूळ शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी हातमिळवणी करून महायुतीचे सरकार स्थापन करीत मुख्यमंत्री पद मिळविले. त्यांनतर लगेचच त्यांनी स्वच्छ व सुंदर मुंबई होण्यासाठी मुंबईत स्वच्छता मोहीम महापालिकेमार्फत राबवायला सुरुवात केली. गेल्या 54 आठवड्यापासून ही स्वच्छता मोहीम सुरू आहे. मात्र अद्यापही मुंबई स्वच्छ का होत नाहीये, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. (Mumbai Despite 54 weeks of cleanliness drive, Mumbai remains unsanitary)

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने आज शनिवारी (ता. 28 डिसेंबर) राबवलेल्या स्वच्छता मोहिमेत 189 मेट्रिक टन डेब्रिज जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्यासाठी महापालिकेचे 01 हजार 682 कामगार, कर्मचारी आणि 190 संयंत्र रस्त्यावर उतरले होते. मात्र या मोहिमेच्या अंतर्गत महापालिकेने नियमभंग करणाऱ्यांकडून 02 हजार 500 रुपयांचा दंड वसूल वसूल केला. दरम्यान, मुंबईकर गेल्या काही दिवसांपासून हवेतील धुळीच्या प्रदूषणाने बेजार झाले आहेत. मुंबईत वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. मुंबईकर सर्दी, खोकल्याने हैराण झाले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेनेही धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी कंबर कसली आहे.

मुंबईतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी, विशेषतः धूळ नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने समर्पित प्रयत्न सुरू केले आहेत, असा दावा पालिकेने केला आहे. वायू गुणवत्ता सुधारणा अभियान अंतर्गत आज, शनिवार 28 डिसेंबर रोजी मुंबई महापालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात, एकाच दिवसात 189 मेट्रिक टन डेब्रीज संकलन करण्यात आले. तर, सुमारे 243 किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले. तसेच नियमभंग करणाऱ्यांकडून 02 हजार 500 रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. वातावरणातील बदलांमुळे मुंबई क्षेत्रासह (मुंबई शहर आणि उपनगरे) मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होऊन वायू प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने मार्गदर्शक तत्वे आणि प्रमाणित कार्यपद्धती यापूर्वीच लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा… Bhiwandi News : साखर झोपेत असलेल्या पती-पत्नीला जाळण्याचा प्रयत्न, भिवंडीत खळबळ

मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबईत गत 54 आठवड्यांपासून संपूर्ण स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरुप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात (वॉर्ड) नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. संपूर्ण 227 स्थानिक संस्था प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे. या अंतर्गत आज (शनिवारी) सर्व प्रशासकीय विभागात लोकसहभागातून संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये, 01 हजार 682 कामगार, कर्मचाऱ्यांनी 190 संयंत्राच्या सहाय्याने ही कामगिरी केली आहे. जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, मेकॅनिकल स्वीपर, ई-स्वीपर, लीटर पीकर मशीन, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी विविध आणि फायरेक्स मशीन, मिस्टींग मशीन यासह अन्य अद्ययावत यंत्रणा दिमतीला होती.


Edited By Poonam Khadtale