घरमुंबईधक्कादायक! लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही वर्षभरात २६ वर्षांच्या डॉक्टर तरुणीला झाला तीनदा...

धक्कादायक! लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही वर्षभरात २६ वर्षांच्या डॉक्टर तरुणीला झाला तीनदा कोरोना!

Subscribe

कोरोना बाधितांची संख्या कमी होत असताना मुंबई येथून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील रूग्णालयातील एका डॉक्टरने कोरोना लसीचे दोन्ही डोस घेल्यानंतर तीन वेळा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर या डॉक्टरला कोरोनाने दोनदा गाठले. या बरोबरच डॉक्टरच्या संपूर्ण कुटूंबालाही कोरोनाची लागण झाली. या डॉक्टरसह कुटुंबातील सदस्यांनीही कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

असा घडला प्रकार

मुंबईतील २६ वर्षीय डॉक्टर सृष्टी हलारी यांना गेल्या १३ महिन्यांत तीन वेळा कोरोनाची लागण झाली आहे. सृष्टी यांनी कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतले असून गेल्या वर्षी १७ जुलै रोजी डॉ. सृष्टी हलारी यांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले तेव्हा त्या मुंबईतील वीर सावरकर रुग्णालयात कोरोना ड्युटीवर होत्या. यावेळी त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे स्वतःमध्ये दिसून आली. गेल्या ८ मार्च रोजी डॉ. सृष्टी हलारी यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आणि २९ एप्रिल रोजी दुसरा डोस घेतला. डॉ. हलारी यांच्यासोबत कुटुंबियांनी देखील कोरोना लसीचे दोन्ही डोसही घेतले. डोस घेतल्यानंतर एक महिन्यानंतर, डॉक्टर हलारी यांनी २९ मे रोजी पुन्हा कोरोना संसर्ग झाला. यादरम्यान, त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागली होती. तेव्हा त्या घरातच होम क्वारंटाईन होत्या.

- Advertisement -

डॉक्टर सृष्टी हलारी हे दुसर्‍या वेळी कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर सुमारे दीड महिन्यांनंतर तिसर्‍यांदा त्यांना पुन्हा कोरोना संसर्ग झाला. सृष्टी हलारी सोबतच तिच्या संपूर्ण कुटूंबालाही कोरोनची लागण झाली. यावेळी सृष्टी हलारी यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला रुग्णालयात दाखल करावे लागले. इतकेच नाही तर त्याच्या भावालाही श्वासोच्छवासाचा त्रास झाला आणि दोन दिवस ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते.

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही, कोरोनाचा तिसर्‍यांदा संसर्ग होणं हे कोरोनाच्या नव्या स्ट्रेन असण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, डॉक्टरला तीनदा कोरोना का झाला, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. यामागे कोरोनाचा व्हेरिएंट, रोगप्रतिकारक शक्ती किंवा कोरोना चाचणीचा चुकीचा रिपोर्ट अशी बरीच कारणे असू शकतात. यासह कदाचित आरटी-पीसीआर टेस्टचा रिपोर्ट चुकीचा असावा. किंवा मेमध्ये दुसऱ्यांदा जे इन्फेक्शन झाले होते, तेच जुलैमध्ये सक्रिय झाले असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -