घरताज्या घडामोडी७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवण्यामध्ये मुंबई सरस !

७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवण्यामध्ये मुंबई सरस !

Subscribe

राज्यातील नऊ विभागीय मंडळात ७५  टक्क्यांहून अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मुंबईत जास्त आहे. मुंबईतून तब्बल एक  लाख ८ हजार ४९ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत निकालात बाजी मारली आहे.

कोरोनामुळे विलंबाने जाहीर झालेल्या निकालामध्ये गतवर्षीच्या तुलनेत मुंबईच्या क्रमवारीत यंदा वाढ झाली. त्याचबरोबर मुंबईतील गुणवतांनीही टक्केवारीमध्ये आपली छाप सोडली आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळात ७५  टक्क्यांहून अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मुंबईत जास्त आहे. मुंबईतून तब्बल एक  लाख ८ हजार ४९ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत निकालात बाजी मारली आहे. गुणवंताच्या या टक्केवारीत मुंबईने पुण्यालाही मागे टाकले आहे. मात्र ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत पुण्याने बाजी मारली आहे.

डिस्टिंगशमध्ये मुंबईच टॉपवर

राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालात यंदा पाच लाख ३९ हजार ३७३ विद्यार्थ्यांनी ७५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळविले आहेत. यामध्ये मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या एक  लाख ८ हजार ४९ इतकी आहे. त्याखालोखाल पुण्यातील एक लाख २ हजार २८२ विद्यार्थी तर नाशिकमधील विद्यार्थ्यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. नाशिकमधील ६७  हजार ४६७  विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. त्याचप्रमाणे प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही मुंबईत सर्वाधिक आहे. प्रथम श्रेणीमध्ये मुंबईतून तब्बल एक लाख १७ हजार ८१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल पुण्यातून ९२ हजार ५८९  विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. तर नाशिकमधील ७१  हजार ३४४  विद्यार्थी प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झाले आहेत. मुंबईच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता ४५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ७४  हजार ८६३ आहे. त्यानंतर ३५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही १९ हजार ५५३ इतकी असल्याचे बोर्डाकडून जाहीर करण्यात आले आहे. तर पुण्यात ४५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ४६  हजार ५४१  इतकी आहे. तर ८ हजार७५६ विद्यार्थ्यार्ना उत्तीर्ण श्रेणीत म्हणजेच ३५ टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळविले आहेत.

- Advertisement -

९० टक्केवारीमध्ये पुण्याची मुंबईवर सरसी

गुणवतांच्या संख्येत मुंबईतील विद्यार्थ्यांनी बाजी मारली असली तरी ९०टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये पुण्याने मागेला टाकले आहे. पुण्यातील १५  हजार ४६६ विद्यार्थ्यांनी ९०  टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. तर मुंबईतील १४  हजार७५६  विद्यार्थ्यांनी ९०  टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -