जोगेश्वरी येथील एसआरए बिल्डिंगमध्ये आग

mumbai fire breaks out in SRA residential building in jogeshwari area short circuit may be the reason
जोगेश्वरी येथील एसआरए बिल्डिंगमध्ये आग

जोगेश्वरी ( प.), येथील ‘आशियाना’ या सहा मजली इमारतीमध्ये शुक्रवारी सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या आगीवर अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनी नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.
सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

प्राप्त माहितीनुसार, जोगेश्वरी ( प.) , ओशिवरा रिलीफ रोड, सुन्नी मुस्लिम कब्रस्तान समोर असलेल्या ‘आशियाना’ (तळमजला अधिक सहा मजली) या एसआरए बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावर गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. ही आग हळूहळू भडकली व स्तर २ ची आग म्हणून घोषित करण्यात आली.

या आगीचे वृत्त पसरताच रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली. अनेकांनी इमारतीमधून बाहेर सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. सदर आगीचा कॉल प्राप्त होताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे काम युध्दपा्तळीवर हाती घेतले. ८ फायर इंजिन, ८ जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी अडीच तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ही आग का व कशी लागली याबाबत स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाकडून चौकशी सुरू आहे.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश कोरोनामुळे १८ दिवस कार्यालयातच राहिले आयसोलेट