घरताज्या घडामोडीतब्बल 'इतक्या' जागांसाठी मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार

तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार

Subscribe

मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. अग्निशामक या पदाच्या तब्बल ९१० जागांसाठी भरती होणार आहे. लवकरच त्याकरिता जाहिरातही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेली ही भरती प्रक्रिया रखडली होती.

मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. अग्निशामक या पदाच्या तब्बल ९१० जागांसाठी भरती होणार आहे. लवकरच त्याकरिता जाहिरातही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेली ही भरती प्रक्रिया रखडली होती. २०१७ मध्ये यापूर्वी भरती झाली होती, तशीच भरती आता होणार आहे. १२वी उत्तीर्ण इच्छुक उमेदवारांची पारंपरिक पद्धतीने शारीरिक तपासणी, वैद्यकीय तपासणींचा या प्रक्रियेत समावेश आहे. दहिसर पश्चिमेकडील भावदेवी मैदानात ही भरती प्रक्रिया होणार आहे. विशेष म्हणजे या भरती प्रकियेचे चित्रीकरणही केले जाणार आहे. त्याकरिता अग्निशमन दलाने नुकत्याच निविदा मागवल्या आहेत. (Mumbai Fire Brigade Recruitment Soon In Mumbai)

मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रियेत उमेदवारांना पोलीस भरतीप्रमाणे वयाची अट २ वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. मुंबई अग्निशमन दलात सुमारे ३००० अग्निशामक जवान, अधिकारी, वाहनचालक असे मनुष्यबळ असून, त्यापैकी २५०० अग्निशामक जवान आहेत. परंतु, पदोन्नती किंवा निवृत्तीमुळे पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली असून, या जागांसाठी ही भरती होणार आहे. याबाबत माहिती अग्निशमन दल प्रमुख संजय मांजरेकर यांनी दिली.

- Advertisement -

या भरती प्रक्रियेबाबत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर डिसेंबरअखेपर्यंत प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याचे समजते. त्यानंतर उमेदवार निवडीची प्रक्रिया, वैद्यकीय चाचणी याकरिता २ महिने लागतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उमेदवारांचे प्रशिक्षण अशा प्रक्रिया पार पाडून सगळे सुरळीत झाले तरी उमेदवारांना प्रत्यक्ष रुजू होण्यासाठी एक वर्ष जाणार असल्याचे समजते.

अशी होईल भरती प्रक्रिया

- Advertisement -
  • भरतीमध्ये वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवली.
  • खुल्या गटासाठी वयोमर्यादा २५ ऐवजी २७ वर्षे असेल.
  • आरक्षणासाठी हीच मर्यादा ३० ऐवजी ३२ वर्षे असेल.
  • सातत्याने रिक्त होणाऱ्या पदासाठी प्रतीक्षा यादी करता येईल का याबाबतही विचार केला जाणार आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरे ओवैसींना बरोबर घेऊ शकतात, पण जिंकेल भाजपा युती; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -