Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबईMumbai Fire : अंधेरीतील इमारतीत भीषण आग, घटनेत घर जळून खाक

Mumbai Fire : अंधेरीतील इमारतीत भीषण आग, घटनेत घर जळून खाक

Subscribe

बुधवारी सकाळीच मुंबईतील अंधेरी येथे असलेल्या वीरा देसाई परिसरातील एका इमारतीतील घराला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी या घटनेत संपूर्ण घर जळून खाक झालेले आहे.

मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. शॉर्ट सर्किट किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे लागत असलेल्या आगींमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महिन्यातून किमान दोन ते तीन वेळा मुंबईतील विविध ठिकाणी आगीच्या छोट्या मोट्या घटना घडत असल्याची माहिती समोर येतेच. अशातच आता बुधवारी (ता. 27 नोव्हेंबर) सकाळीच मुंबईतील अंधेरी येथे असलेल्या वीरा देसाई परिसरातील एका इमारतीतील घराला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी या घटनेत संपूर्ण घर जळून खाक झालेले आहे. या घटनेमुळे इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली. (Mumbai Fire Massive fire in building in Andheri, the house was gutted in the incident)

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीतील (प.) वीरा देसाई रोडवर असलेल्या सहा मजली निवासी इमारतीला बुधवारी (ता. 27 नोव्हेंबर) सकाळी 9-9.15 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. चिंचन या सहा मजली इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील एका घराला ही आग लागली. याबाबत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी 09 वाजेच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेनंतर घटनास्थळी कुलिंग ऑपरेशन करण्यात आले. पण ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतचे कोणतेही कारण समोर आलेले नाही. पण आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ज्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्ध पातळीवर काम करत आगीवर नियंत्रण मिळवले.

- Advertisement -

हेही वाचा… Maharashtra Election Result 2024 : मुंबईतील किती उमेदवारांनी गमावले डिपॉझिट?

या आगीच्या घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाने एकत्रितपणे इमारतीमधील सर्व रहिवाश्यांना बाहेर काढले. ज्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीची माहिती मिळताच इमारतीमध्ये एकच धावपळ झाली. काही लोकांनी आगीपासून बचाव होण्यासाठी तत्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. पण मुंबईत आगीच्या घटना वाढण्याचे नेमके कारण काय? असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. या घटनेच्या 24 तास आधीच म्हणजे मंगळवारी (ता. 26 नोव्हेंबर) कल्याणमधील आधारवाडी परिसरातील प्रसिद्ध व्हर्टेक्स हौसिंग सोसायटीमधील 17व्या आणि 18व्या मजल्यावर अचानक भीषण आग लागली. आगीमुळे इमारतीतून मोठा धुराचा लोट निघाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -