घरमुंबईविलेपार्ले येथे गॅस सिलिंडरचा स्फोट, ५ जण जखमी

विलेपार्ले येथे गॅस सिलिंडरचा स्फोट, ५ जण जखमी

Subscribe

मुंबई -: विलेपार्ले (पूर्व) येथे एका चाळीतील घरात पहाटे ५ वाजताच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत ५ जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ नजीकच्या व्ही.एन.देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

प्राप्त माहितीनुसार, विलेपार्ले (पूर्व), वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे येथे न्यू कल्पना चाळीत सर्वजण झोपेत असताना एका घरात मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने घराच्या भिंतींना तडे गेले. तर आजूबाजूच्या घरांना हादरा बसला. स्फोटाच्या घटनेमुळे आजूबाजूच्या नागरिकांनी झोपेतून खडबडून जागे होत नेमके काय घडले हे पाहण्यासाठी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सदर घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचे समजताच काही नागरिकांनी घराच्या दिशेने धाव घेतली.

- Advertisement -

यावेळी, सदर घटनेत जखमी अमर राय (२७), जयराम यादव (२७), हरेकुमार राय (३८) राकेशकुमार राय (३०) आणि अरुणकुमार राय (४५) या पाच जणांना जखमी अवस्थेत तात्काळ नजीकच्या व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मात्र ही दुर्घटना का व कशी काय घडली याबाबत स्थानिक पोलीस सखोल माहिती घेत आहेत.

मात्र अग्निशमन दलाकडे कॉलची माहिती नाही

- Advertisement -

विलेपार्ले (पूर्व) येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ५ जण जखमी झाले तरी या घटनेबाबत अग्निशमन दलाकडे माहिती नसल्याचे समजते.


यंदाची G20 परिषद भारतात; पंतप्रधान मोदींनी लाँच केली वेबसाईट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -