घरमुंबईमुंबईतील अंधेरी, घाटकोपर परिसरात आगीच्या घटना; सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईतील अंधेरी, घाटकोपर परिसरात आगीच्या घटना; सुदैवाने जीवितहानी नाही

Subscribe

मुंबईत दिवाळी सणाच्या दरम्यान आज अंधेरी आणि घाटकोपर परिसरात आगीच्या घटना समोर आल्या आहेत. अंधेरीतील साकीनाका परिसरातील जंगलमंगल रोड परिसरात आज सकाळच्या सुमारास आगीची घटना घडली आहे. तर दुसरीकडे घाटकोपरमधील असल्फा परिसरातील मस्जिद गल्ली परिसरातील कचरा गोदामाला भीषण आग लागली आहे. या दोन्ही आगीच्या घटनांमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसेच सुदैवाने जीवितहानीची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, साकीनाका परिसरातील जंगलमंगल रोड, बारदान गल्लीत ही आगीची घटना घडली आहे. सकाळी 6.30 च्या सुमारास प्लास्टिकच्या गोडाऊनला ही आग लागली आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमक दलाच्या 8 गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीची घटना घडली तेव्हा गोडाऊनमध्ये कोणी नव्हते. त्यामुळे घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याची माहिती आहे. मात्र या दुर्घटनेत गोडाऊनमधील मालाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे घाटकोपरमधील असल्फा परिसरातील मस्जिद गल्लीमधील एका कचरा गोडाऊनला आज भीषण आग लागली आहे. या गोडाऊमध्ये मोठ्याप्रमाणात प्लास्टिकचा कचरा असल्याने आगीचा भडका उडाला. ज्यामुळे संपूर्ण परिसरात धुराचं साम्राज्य निर्माण झालं आहे. या आगी मागचं कारणही अद्याप समोर आलेलं नाही.

चिंचोळ्या गल्लीत असलेल्या गोडाऊमध्ये ही आग लागल्याने अग्निशमन दल आणि पोलीस दलाकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरु होते. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 4 गाड्या आणि 4 टँकर दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळाल्याची माहिती समोर आली आहे.


भारतावर राज्य करणाऱ्या युकेला मिळाले भारतीय वंशाचे पंतप्रधान, मोदींकडून ऋषी सुनक यांचे अभिनंदन


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -