Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई दहिसरमध्ये महिलांच्या अग्निशमन दलाच्या भरतीत गोंधळ; मुलींवर पोलिसांकडून लाठीचार्ज

दहिसरमध्ये महिलांच्या अग्निशमन दलाच्या भरतीत गोंधळ; मुलींवर पोलिसांकडून लाठीचार्ज

Subscribe

दहिसरमध्ये आज महिलांच्या अग्निशमन दलाच्या भरतीदरम्यान मोठा गोंधळ झाला आहे. जास्त उंचीच्या मुलींनाही भरती प्रक्रियेतून बाहेर काढलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे भरतीसाठी आलेल्या लाखो तरुणींनी मुंबई अग्निशमन दलाची भरती प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केलं आहे. तसेच या भरतीसाठी पात्रता पूर्ण करुन संधी दिली जात नसल्याचा आरोप आंदोलक तरुणी करत आहे. या आरोपांमुळे भरती केंद्रावर मोठ्या गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. यावेळी आक्रमक तरुणींनी परीक्षा रद्द करण्यासाठी घोषणाबाजी सुरु केली. आक्रमक तरुणी आणि पोलिसांमध्येही बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलर तरुणींवर लाठीचार्ज केला. या गोंधळानंतर आत दहिसरमध्ये पोलिसांचा (Police) मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये काही मुली जखमी झाल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग भरती मंडळाने डिसेंबर 2022 मध्ये एकूण 910 पदांसाठी अग्निशमन दलाची भरती केली होती. यावेळी पात्र उमेदवारांनी अग्निशमन दलाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरला. यानंतर महिला उमेदवारांना 13 ते 31 डिसेंबर आणि 1 ते 4 फेब्रुवारी 2023 या कालावधीत बायोडेटा आणि शैक्षणिक कागदपत्रांसह वॉन इन सिलेक्शनसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले.

- Advertisement -

यानुसार महिला उमेदवार आवश्यक कागदपत्रांसह दहिसरच्या मंडपेश्वरमधील जननेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान जे. बी. सी.एन. शाळेजवळ वॉन इन सिलेक्शनसाठी पोहचले. राज्यातील कानाकोपऱ्यातून तरुणी रात्रभर या भरती केंद्राबाहेर थांबल्या होत्या. पण यावेळी अनेक तरुणींना उंची कमी असल्याचे तर काहींना उंची दिलेल्या निकषात असतानाही भरती प्रक्रियेतून नाकारण्यात आले. यावेळी मुलींनी आत जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांचा रस्ता अडवला. त्यानंतर आक्रमक तरुणींची घोषणाबाजीदरम्यान पोलिसांसोबत झटापट झाली.  अग्निशमन दलाच्या भरतीसाठी आलेल्या मुलींवर एम. एच. बी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये काही मुली जखमी झाल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान आज सकाळपासूनच दहिसर येथील अग्निशमन दलाच्या केंद्रावर भरती प्रक्रिया सुरू आहे. मात्र भरती प्रक्रिया सुरु झाल्यापासून या ठिकाणी गोंधळ सुरू आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यातून जवळपास दोन ते तीन हजार मुली राज्यातील कानाकोपऱ्यातून दहिसरमध्ये दाखल झाल्या होत्या. मात्र, मुलींना भरतीसाठी उंची 162 सेंटीमीटर असल्याचे सांगण्यात आले आहे. पण यावेळी 163 किंवा 164 सेंटीमीटर उंची असलेल्या उमेदवारांनाही यातून बाहेर काढले असा आरोप मुलींनी केला आहे. यावेळी राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेल्या तरुणींनी भर उन्हात आंदोलन करत आहेत. यावर आत आक्रमक तरुणींकडून ही भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली जात आहे.


यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी भरीव तरतूद; मैदानं भाड्याने देण्याचे संकेत

- Advertisement -
- Advertisement -
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -