घरताज्या घडामोडी'करोना' विरोधात सार्वजनिक मंडळे एकवटली

‘करोना’ विरोधात सार्वजनिक मंडळे एकवटली

Subscribe

मुंबईसह राज्यात फोफावलेल्या करोनाविरोधात दोन हात करण्यासाठी सरकारनंतर आता मुंबईतील सार्वजनिक मंडळांनी देखील एकत्र येण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईसह राज्यात फोफावलेल्या करोनाविरोधात दोन हात करण्यासाठी सरकार पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सरकारनंतर आता मुंबईतील सार्वजनिक मंडळांनी देखील एकत्र येण्यास सुरुवात केली असून करोना विरोधात एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाउनमुळे अनेक गोरगरिबांना, फुटपाथवर राहणाऱ्या आणि रोजनदारीवर असलेल्यांना मदतीचा हात पुढे करीत सार्वजनिक मंडळांनी आता पुन्हा एकदा मुंबई स्पिरीट दर्शन दाखविले आहे. यामध्ये अनेक मंडळांनी बेघरांना जेवणाच्या तर काही मंडळांनी मास्क आणि इतर वस्तू देऊ करीत मदत करीत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबईसह भारतावर सध्या करोनाचे सावट पसरले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच २१ दिवसांचे लॉकडाउन जाहीर केले आहे. या लॉकडाउनमुळे मुंबईसह राज्यात बंदचे वातावरण आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. याचा फटका मुंबईतील गोरगरिबांना बसला आहे. विशेष म्हणजे फूटपाथवर राहणाऱ्या बेघरांचा प्रश्न जटिल झाला आहे. किंबहुना त्यांच्यासमोर भूकमारी सारखे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे मुंबईवर सध्या दुहेरी संकट ओढवले आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी सरकार पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने उपायोजना राबविण्यात येत असल्या तरी मुंबईतील पदपथावर राहणाऱ्या बेघरांसमोर, रोजनदारीवर असणाऱ्या कामगारांसमोर दोन घास कसे मिळतील?, असा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आता मुंबईतील सार्वजनिक मंडळांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. यात प्रामुख्याने लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचे नाव घेता येईल, मंडळातर्फे काही दिवसांपूर्वीच रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आल्याची घोषणा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी केली. या मंडळानंतर आता मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळे आणि नवरात्रोत्सव मंडळे करोनाविरोधात पुढे सरसावले आहेत.

- Advertisement -

मुंबईतील फेरबंदर सार्वजनिक मंडळातर्फे विभागातील गरजूंसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. यात मंडळातर्फे दररोज दोनशे लोकांना जेवणाचे वाटप करण्यात येते आहे. जेवणाचा खर्च मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून स्वखर्चाने केला जात असल्याची माहिती मंडळाचे सदस्य भूषण देसाई यांनी दिली. त्याचप्रमाणे मुंबईतील अनेक मंडळांनी जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा सुरू करण्याचे काम हाती घेत मुंबईकरांना घरच्या बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी मंडळांकडून पोलिसांची देखील मदत घेतली जात आहे. याबरोबरच अनेक मंडळांनी सध्या २४ तास कार्यरत असलेल्या पोलिसांसाठी नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. तर अनेक मंडळाकडून गरजू लोकांना मास्क आणि हॅण्ड सॅनिटायझर वाटप सुरू केले आहेत. तर अनेक मंडळांनी आपल्या विभागात जंतुसंसर्ग टाळण्यासाठी जंतूनाशकाची फवारणी सुरू करीत करोना विरोधात दोन हात करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नेहमी कौतुकाचा विषय ठरणारे मुंबईतील सार्वजनिक मंडळांनी पुन्हा एकदा मुंबईच्या स्पिरीटचे दर्शन घडविले आहे.


हेही वाचा – नागरिकांचे स्थलांतर थांबवा, राज्यपालांनी दिले आयुक्तांना निर्देश

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -