घरमुंबईमुंबईत दहा वाहनतळांमध्ये लवकरच इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन

मुंबईत दहा वाहनतळांमध्ये लवकरच इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन

Subscribe

मात्र देशात बहुतांश लोक अजूनही इलेक्ट्रिक वाहनांकडे पर्याय म्हणून पाहात नाहीत. यातलं प्रमुख कारण म्हणजे इलेक्ट्रिक वाहनं चार्ज करण्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईत नाही. म्हणून हा विचार करून आता मुंबई महापालिकेने काही ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनची उभारणी केली आहे.

वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू लागले आहे. जग आता इलेक्ट्रिक वाहनांकडे भविष्य म्हणून पाहात आहे. मुंबईतही इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झपाट्याने वाढत आहे. मात्र देशात बहुतांश लोक अजूनही इलेक्ट्रिक वाहनांकडे पर्याय म्हणून पाहात नाहीत. यातलं प्रमुख कारण म्हणजे इलेक्ट्रिक वाहनं चार्ज करण्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईत नाही. म्हणून हा विचार करून आता मुंबई महापालिकेने काही ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनची उभारणी केली आहे. आता शहर व उपनगरात दहा ठिकाणच्या सार्वजनिक वाहनतळांच्या ठिकाणी आणखीन ‘इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन’ सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संतुलनासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विद्युत वाहनांच्या वापरांना प्रोत्साहन दिले जात आहे. या धोरणाच्या अंतर्गत विद्युत वाहनांची निर्मिती, त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा यांना देखील प्रोत्साहन दिले जात आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल)ने पुढाकार घेतला आहे. त्याबाबतच्या करारावर महापालिका मुख्यालयात समिती सभागृहात मंगळवारी छोटेखानी समारंभात स्वाक्षऱ्या करून मुंबई महापालिकेने एचपीसीएल सोबत करार केला आहे. महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू व अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी आणि ‘एचपीसीएल’ च्या वतीने कार्यकारी संचालक संदीप माहेश्वरी, मुख्य महाव्यवस्थापक देबाशिष चक्रवर्ती यांनी कराराचे आदानप्रदान केले.

- Advertisement -

हे ही वाचा: आता घरी बसून मतदान करणं आहे शक्य, व्होट फ्रॉम होमची घोषणा…

मुंबई महापालिका – एचपीसीएल यांच्यातील करार
या करारानुसार, महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये एचपीसीएल यांना चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी जागा पुरवली जाणार आहे. त्यासाठी महापालिका प्रारंभीची वर्षे भाडे आकारणार नाही. परंतू एचपीसीएलच्या वतीने प्रति वीज युनिट एक रुपया दराने महापालिकेला रक्कम देण्यात येईल. तसंच या चार्जिंग स्टेशनवर विद्युत वाहने चार्जिंसाठी एचपीसीएलकडून वाजवी दर आकारले जाणार आहेत. प्रत्येक स्टेशनवर सरासरी दोन पॉईट पुरवले जाणार असल्याने दोन वाहने चार्ज करता येणार आहेत. वाहनतळांची ठिकाणे, त्यांच्या गरजा यानुसार या सर्व बाबींना अंतिम रुप दिले जाणार आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या धोरणानुसार, २०३० पासून भारतात विक्री केली जाणारी प्रत्येक मोटारकार इलेक्ट्रिक असणार आहे. इलेक्ट्रिक कार जीवाश्म इंधनाऐवजी पर्यायी इंधन म्हणून वीज वापरते. पारंपरिक वाहनांचे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर केल्यास प्रतिवर्षी सुमारे १०० अब्ज डॉलर किमतीच्या जीवाश्म इंधनाची बचत होऊन देशाचे परकीय चलन वाचेल. तसेच शहरांमधील प्रदूषण कमी करता येऊ शकेल, प्रदूषण कमी करण्यासाठी व इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था यांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे. भविष्यात सौर ऊर्जा आणि इतर नवीन ऊर्जा स्त्रोतांच्या वापरावर देखील भर दिला जाईल, असा दावा पी. वेलरासू यांनी यावेळी केला.

हे ही वाचा: भडकाऊ भाषणावरून सुप्रीम कोर्टाचे शिंदे-फडणवीस सरकारला आदेश, वाचा सविस्तर…

घराजवळच २४ तास चार्जिंग स्टेशन
कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. मुंबईत आतापर्यंत १८ हजार ९९३ आणि महाराष्ट्रात १ लाख ८९ हजार ६४३ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईतील नागरिकांना त्यांच्या घराजवळ चोवीस तास कार्यरत चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महापालिका करीत असल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी सांगितले.

हे ही वाचा: राजकारणातील मित्रत्व जोपासाणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले; गिरीश बापट यांना विखे पाटलांची श्रद्धांजली

दहा इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशनची ठिकाणे -:

१) एच. पी. पेट्रोल पंपाजवळील रुणवाल अँथोरियम, मुलुंड (पश्चिम)
२) डॉ.नायर मार्ग, जेकब सर्कल, भायखळा
३) सी.एस.क्रमांक ६३ व ६४, अपोलो मील कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ
४). कल्पतरू एव्हाना इमारत, एम.जी.एम. हॉस्पिटलजवळ, परळ-शिवडी
५) भूखंड क्रमांक ११/१२४ (अंशतः) व १२/१३४(अंशतः) येथे भूखंड, ग. द. आंबेकर मार्ग, काळाचौकी, एफ/दक्षिण
६) हिल रोड व आइस फॅक्टरी लेन यांच्या जंक्शनवर, वांद्रे (पश्चिम)
७) वसंत ओऍसिसजवळ, मरोळ, अंधेरी(पूर्व)
८) पहाडी गोरेगावच्या भूखंडावरील बहुमजली सार्वजनिक वाहनतळ, उमिया माता मंदिरामागे
९) पहाडी गोरेगाव, एस.व्ही.रोड, गोरेगाव (पश्चिम) टोपीवाला मार्केट इमारत
१०) एकसार गाव, देविदास गल्ली, (क्लब एक्वारिया), बोरिवली (पश्चिम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -