घरमुंबईमुंबई - गोवा : भोस्ते घाटात एलपीजी टँकर उलटला; महामार्गावर वाहतूककोंडी

मुंबई – गोवा : भोस्ते घाटात एलपीजी टँकर उलटला; महामार्गावर वाहतूककोंडी

Subscribe

पोलिसांनी भोस्ते घाटाच्या दोन्ही बाजूंनी नाकाबंदी करत वाहतूक बंद केली.

मुंबई – गोवा महामार्गावर (mumbai goa highway) अपघात होणे किंवा अवजड वाहने उलटणे यांसारख्या घटना या कधीही घडल्या आहेत. दरम्यान मुंबई – गोवा महामार्गावर भोस्ते घातली अवघड वळणावर एलपीजीची वाहतूक करणारा टँकर उलटल्याची घटना घडली. काल संध्याकाळी  वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तर महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या.

मुंबई – गोवा महामार्गावर (mumbai goa highway) एलपीजीची (LPG) वाहतूक करणारा टँकर उलटल्याने गॅस गळती झाली त्यामुळे त्या परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण झाले. दरम्यान खेड पोलिसांनी घाट दोन्ही बाजूंनी बंद करून महामार्गावरील वाहतूक दुसऱ्या वळविली.

- Advertisement -

दरम्यान पोलिसांनी भोस्ते घाटाच्या दोन्ही बाजूंनी नाकाबंदी करत वाहतूक बंद केली. भोस्ते घाट (bhoste ghat) बंद झाल्यामुळे वेरळ- कोंडीवली-शिव मार्गे बोरज या पर्यायी मार्गावरून लहान वाहने पाठविण्यात आली. तर मोठी वाहने महामार्गावर रखडली. दरम्यान भोस्ते घाट हा मृत्यूचा सापळा बनत चालला असून काही दिवसांपूर्वीही एलपीजीची वाहतूक करणारा टँकर पलटला होता.

अवघड वळणावर टँकरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच कशेडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. पी. चांदणे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान गॅस गळतीमुळे या मार्गावरील वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. रात्री आठ नंतर वाहतुक पूर्ववत करण्यात झाली. अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली.

- Advertisement -

हे ही वाचा –  राहुल गांधींच्या नेतृत्वातील सरकार केंद्रात हवे; मल्लिकार्जुन खर्गेंचे विधान

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -