घर मुंबई Mumbai-Goa Special Train : गोव्याला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-गोवा विशेष ट्रेन धावणार

Mumbai-Goa Special Train : गोव्याला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-गोवा विशेष ट्रेन धावणार

Subscribe

मुंबई : ओडिशा येथील भीषण रेल्वे अपघातामुळे ‘वंदे भारत ट्रेन’चा 3 जून 2023 रोजी होणारा उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला. मात्र गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी तसेच कोकणातील लोकांसाठी मध्य रेल्वेने मुंबई-मडगाव दरम्यान विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (Good news for those going to Goa, Mumbai-Goa special train will run)

मध्य रेल्वेकडून सोडण्यात येणारी ही विशेष ट्रेन सीएसएमटीहून मडगावपर्यंत धावणार आहे, मात्र परतीच्या प्रवास करणार नाही. सुट्टीचा कालावधी लक्षात घेता अनेकांना रेल्वे आरक्षण मिळाले नाही. अशा प्रवाशांसाठी ही विशेष ट्रेन दिलासा देणार आहे. या ट्रेनसाठी मध्य रेल्वेकडून आरक्षण सुरू करण्यात आले आहे.

- Advertisement -

ही विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई-मडगाव एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 01149) शुक्रवारी 9 जून रोजी पहाटे 5.30 वाजता सुटणार असून मडगाव जंक्शनला त्याच दिवशी संध्याकाळी 5.20 वाजता पोहचणार आहे. ही विशेष ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आणि करमाळी या स्थानकांवर थांबणार असून ही 16 डब्यांची रेल्वे असणार आहे. यामध्ये एक विस्टाडोम कोच आहे, तर एसी चेअर कार कोच 3, द्वितीय श्रेणी आसन कोच 10, एसएलआर कोच 1 आणि जनरेटर कार 1 अशी रचना असणार आहे.

‘वंदे भारत एक्सप्रेस’चे उद्घाटन लांबणीवर
ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर मुंबई-मडगाव दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा 3 जून रोजी होणारा उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा उद्घाटन कार्यक्रम मडगाव येथे पडणार होता. त्याची तयारीदेखील पूर्ण झाली होती. मात्र, ओडिशामध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.

- Advertisement -

‘वंदे भारत एक्सप्रेस’ वेळ आणि थांबे
मुंबई सीएसएमटी-मडगाव दरम्यान ‘वंदे भारत एक्सप्रेस’ धावणार असल्यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्याला सहा दिवस चालवण्याचं सध्या ठरवण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मडगाव, थिविम, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर, सीएसएमटी या स्थानकांवर वंदे भारत ट्रेनला थांबा देण्यात आला आहे. सध्याच्या प्रस्तावानुसार सीएसएमटी वरून सकाळी 5.35 ला ट्रेन सुटेल आणि मडगावला दुपारी 1.15 वाजता वंदे भारत ट्रेन पोहोचणार आहे. त्यानंतर दुपारी 2.35 वाजता ही ट्रेन मडगाव वरुन मुंबईकडे रवाना होऊन रात्री 10.25  वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. वंदे भारत एक्सप्रेस ही कोकण मार्गावर धावणारी सर्वात जलद एक्सप्रेस आहे. तेजस एक्सप्रेसपेक्षाही एक तास लवकर ही ट्रेन मडगावला पोहोचणार असल्यामुळे या ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा मध्य रेल्वेला आहे.

- Advertisment -