घरमुंबईमुंबईत 'लेसर फ्लेमिंगोची' संख्या अधिक

मुंबईत ‘लेसर फ्लेमिंगोची’ संख्या अधिक

Subscribe

मुंबईतील रोहित पक्ष्यांची (फ्लेमिंगो) ची संख्या आता १ लाख २१ हजारपर्यंत पोहोचली असली तरी देखील यामध्ये लेसर फ्लेमिंगोची संख्या वाढलेली आहे. तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी सर्वेक्षणाच्या माहितीनुसार ग्रेटर फ्लेमिंगोची संख्या कमी झाल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील गुलाबी पाहुणे रोहित पक्ष्यांची (फ्लेमिंगो) ची संख्या आता १ लाख २१ हजारपर्यंत पोहोचली आहे. तसेच यामध्ये लेसर फ्लेमिंगोची संख्या वाढलेली असून ग्रेटर फ्लेमिंगोची संख्या मात्र कमी झाली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने जानेवारी २०१९ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी सर्वेक्षणाची माहिती

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने मुंबई परिसरातील फ्लेमिंगोवरील दीर्घकालीन पर्यावरणीय अभ्यास तसेच या पक्ष्यावरील विकासात्मक कामांचा प्रभाव समजून घेण्यासाठी मुंबईच्या शिवडी समुद्राची निवड केली. या अभ्यासाकरिता विटावा ते शिवडी आणि जेएनपीटी या दोन्ही किनाऱ्यांना एक किलोमीटरच्या त्रिज्यांमध्ये विभागण्यात आले. तसेच एका दिवसात संशोधक आणि सहाय्यकांच्या गटांनी बोटीतून सर्वेक्षण केले. तसेच हे सर्वेक्षण सलग तीन दिवस करण्यात आले होते. त्यावरुन त्यांच्या संवर्धन आणि संरक्षणाचे उपाय केले जातात, असे या प्रकल्पाचे मुख्य अभ्यासक आणि बीएनएचएसचे सहाय्यक संचालक राहुल खोत यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

समुद्र किनारे स्वच्छ करणे गरजेचे

या सर्वेक्षणावरुन असे लक्षात येते की पूर्वेकडील प्रदूषित समुद्र किनारे स्वच्छ करण्याची गरज आहे. तसेच फ्लेमिंगो आणि इतर स्थलांतरीत पक्ष्यांना प्रदूषणमुक्त अधिवास देता येईल. त्यांचा अधिवास सुरक्षित राखताना अधिक जबाबदार आणि संवेदनशिल असणे आवश्यक असल्याचे मत बीएनएचएसचे संचालक डॉ. दीपक आपटे यांनी व्यक्त केले आहे.


वाचा – शेवाळामुळे लांबला फ्लेमिंगोंचा गुजरात दौरा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -