घरमुंबईमुंबईत अवघे ४३४ क्षयरुग्ण; पालिकेच्या मोहीमेला यश

मुंबईत अवघे ४३४ क्षयरुग्ण; पालिकेच्या मोहीमेला यश

Subscribe

मुंबई महापालिकेने क्षयरोगाविरोधातील आपली मोहीम अधिक तीव्र करताना १ ते १६ डिसेंबरदरम्यान १२ लाख १२ हजार ६९३ घरातील ५० लाख ५४ हजार ४३२ व्यक्तींची क्षयरोग तपासणी केली.

क्षयरोगमुक्त मुंबईसाठी महापालिकेने क्षयरुग्णांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत १ ते १६ डिसेंबरदरम्यान केलेल्या ५० लाख ५४ हजार ४३२ तपासण्यांमधून अवघे ४३४ क्षय रुग्ण सापडले आहेत.

मुंबई महापालिकेने क्षयरोगाविरोधातील आपली मोहीम अधिक तीव्र करताना १ ते १६ डिसेंबरदरम्यान १२ लाख १२ हजार ६९३ घरातील ५० लाख ५४ हजार ४३२ व्यक्तींची क्षयरोग तपासणी केली. या तपासणीत ९,५०० व्यक्ती संशयित आढळले. यापैकी ४३४ व्यक्तींना क्षयरोग असल्याचे स्पष्ट झाले. या क्षयरुग्णांवर पालिकेच्या किंवा राज्य सरकारच्या अखत्यारीतील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. या शोध मोहिमेत पालिकेचे ३,४५१ पथके सहभागी असून महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करत आहेत. हे सर्वेक्षण सकाळी ९ ते सायंकाळी ४ दरम्यान केले जात आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार आता ही मोहीम ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

क्षयरोगाची लक्षणे

  • १४ दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला
  • दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ ताप
  • सायंकाळच्या वेळेस ताप येणे
  • वजनात लक्षणीय घट होणे
  • थुंकीमधून रक्त पडणे
  • छातीत दुखणे
  • मानेवर सूज असणे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -