घरमुंबईमुंबईत जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा

मुंबईत जुलैपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा

Subscribe

पावसाच्या मोसमात मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलावांमधील पाणी आटत चालले असून येत्या जुलैपर्यंतच पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती महापालिकेने दिली असून पाणी जपून वापरा, असे आवाहन महापालिकेने मुंबईकरांना केले आहे.

जून महिना संपत आला तरी पावसाचा अद्याप काही पत्ता नाही. पावसाच्या मोसमात मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलावांमधील पाणी आटत चालले आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करणार्‍या राज्य सरकारच्या ताब्यातील भातसा आणि अप्पर वैतरणा तलावातील पाण्याच्या पातळीने तळ गाठल्याने मागील काही दिवसांपासून या तलावातील राखीव कोट्यातून पाणी उचलले जात आहे. मात्र, महापालिकेच्या तलावांमधील राखीव कोट्याला अद्यापही हात लावला नसला तरी लांबलेल्या पावसामुळे महापालिकेची चिंता अधिकच वाढली आहे. बृहन्मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील राखीव साठ्यातून आता पाणीपुरवठा केला जात आहे. सदर पाणीपुरवठ्याद्वारे मुंबईवासियांना जुलैअखेरपर्यंत सुरळीतपणे पाणीपुरवठा करता येईल, असे पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे.

पाणी जपून वापरण्याचे आवााहन

यंदाचा पावसाळा मुंबईत किंवा इतर तलाव क्षेत्रांत अजुनही मोठ्या प्रमाणात सुरु झाला नसल्याने तलावात पाणीसाठा जमा होत नसल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेने जरी जुलैअखेर पर्यंत पाणी पुरविण्याचे नियोजन केले असले तरी, मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, तसेच साठविलेले पाणी टाकून न देता त्याचा इतर उपयोगासाठी वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने मुंबईकरांना केले आहे.

- Advertisement -

पाणी कपातीत वाढ करण्याचा निर्णय नाही

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस लागेल अशी अपेक्षा होती. पण संपूर्ण जून महिनाच कोरडा गेला. त्यामुळे तलावातील पाण्याची पातळीने अजूनच तळ गाठला आहे. २०१८ मध्ये २६ जून रोजी तलावातील पाणीसाठी २ लाख ५३ हजार दशलक्ष लिटर एवढा होता. यावेळी १ लाख ८० हजार दशलक्ष लिटरने पाणीसाठा कमी असल्यामुळे पाऊस पडणे आवश्यक आहे. मात्र अद्यापपर्यंत पाणी कपातीत वाढ करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.


हेही वाचा – जून अखेरपर्यंत पाऊस नाही… पालिकेची चिंता वाढली!

- Advertisement -

हेही वाचा – दुषित पाण्याच्या तक्रारी आल्यास २४ तासात निकाली काढा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -